लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Sunday 30 November 2014

टेंभू चे शिवधनुष्य उचलण्याचे आव्हान शिवसेनेला पेलेल का ?

टेंभू चे  शिवधनुष्य उचलण्याचे आव्हान शिवसेनेला पेलेल का ?
टेंभू योजना पूर्ण करणे हि गोष्ट आज घडीला तरी अशक्य कोटीतील गोष्ट वाटत आहे. झालेली कामे , सुरु असलेल्या कामांची एकूण प्रगती, निधीची उपलब्धता, नियोजन , आराखडा आणि शासकीय पातळीवर असलेली अनास्था पहिली तर हि योजना कधीच पूर्ण होणार नाही असे वाटते. या पार्श्वभूमीवर
टेंभू चे  हे शिवधनुष्य उचलण्याचे आव्हान शिवसेना पेलेल का ?

Saturday 6 September 2014

टेंभू के नाम पे . . . ?

टेंभू के नाम पे . . . ? 
मित्रांनो, टेंभू च्या नावावर आणखी एक चळवळ सुरु होत आहे. आता ती आटपाडीत नाही, तर खानापूर तालुक्यात. बळीराजा धरणाचे आद्य प्रवर्तक भाई संपतराव पवार आणि सतीश लोखंडे (वकील) यांच्या पुढाकाराने हि चळवळ सुरु होत आहे. 10 सप्टेंबर पासून त्याला मूर्त रूप येणार आहे म्हणे.  टेंभू च्या नावावर आज वर किती जणांनी किती वेळा आणि काय काय म्हणत चळवळी सुरु केल्या.  पण योजना काही पूर्ण व्हायचे नाव घेत नाही आणि पाणी काही मिळत नाही. तरीही प्रत्येकाच्या तोंडात टेंभू चे नाव असते. गेली  20  वर्षे इथले सगळे राजकारण या नावा भोवतीच फिरत आहे, मते देखील टेंभू च्या नावानेच मागितली जात आहेत. आता सुद्धा टेंभू भोवतीच येणारी विधानसभा आणि प्रचार फिरणार आहे हे स्पष्ट दिसत आहे. त्याचाच हा एक भाग असावा अशी शंका अनेक जन व्यक्त करीत आहेत. कारण सतीश लोखंडे याना डाव्या आघाडीचे उमेदवार म्हणून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. जनतेला (म्हणजे तुम्हा -  आम्हाला )  माय बाप सरकारने आजवर पाणी देतो म्हणून गंडवले. आता आपलेच म्हणवणारे परत एकदा टेंभू च्या पाण्याची आस दाखवत फसवणार… चालू दे 
 साला एक टेंभू … एक टेंभू योजना हैं जो पुरा होने का नाम नाही लेती / /
सो जब तक हैं ,  टेंभू …. राजकारण करनेवालोंको डरने कि ,
क्योंकी आखिर टेंभू के नाम पे .. . . हि तो आज तक हम लोग और राजकारन करणे वाले भी जिंदा हैं / /
चलो फिरसे शुरू हो जाओ … .

खानापूर घाटमाथ्यावर नेण्यासाठी आता आणखीन एक नवीन पर्याय देणार

टेंभू योजनेचे पाणी खानापूर घाटमाथ्यावर नेण्यासाठी आता आणखीन एक नवीन पर्याय  मांडण्यात येणार आहे…भाई संपतराव पवार आणि सतीश लोखंडे यांची माहिती.
टेंभू योजनेची प्रत्येक बातमी , प्रत्येक घडामोड , प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण, अत्यंत निष्पक्ष माहिती आणि सडेतोड मते फक्त

http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/

या ब्लॉग वर
कृपया नव्या जुन्या सर्व पोस्ट्स पहाव्यात.


Monday 7 July 2014

राज्य सरकार ने टेंभू बाबत झटकले हात…

 ******अत्यंत महत्वाचे *******
टेंभू ला निधी देण्यास राज्य सरकार असमर्थ
शासनाचे थेट उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रच सादर
मच्छिंद्र पाटील यांच्या  याचिकेच्या सुनावणीच्या वेळी राज्य सरकार ने टेंभू बाबत झटकले हात…


Monday 9 June 2014

त्रांगडे टेंभू योजनेचे - धरण नाही, पाणी ही नाही आणि पुनर्वसनही नाही.

टेंभू उपसा जलसिंचन योजनेसाठी आरक्षित एकूण २२. १३ टि.एम. सी. (म्हणजे अब्ज घन फुट )पाण्यापैकी वांग - मराठवाडी धरणातून ०. ९७ टि.एम. सी.पाणी देण्यात येणार नियोजनात आहे. मात्र हे नियोजन योजना मंजूर होऊन तब्बल १८ वर्षे झाली तरी आज अखेर केवळ कागदावरच आहे. तसेच या धरणाचे प्रकल्पग्रस्त सध्या खानापूर तालुक्याच्या फोंड्या माळावर विस्थापितांचे जीवन जगत आहेत.
त्रांगडे टेंभू योजनेचे - धरण नाही, पाणी ही नाही आणि पुनर्वसनही नाही.

Sunday 1 June 2014

भाव, देव आणि धर्म हि तूच तू … !

सोन्याची असते द्वारका ,
पोथ्या पुराणात सांगतात . 
ऐकणाराच्या घराला लाकडाचेहि खांब नसतात. 
पुराणातील वांगी चिरून भाजी कधी शिजत नाही,
वरुणाचा धावा करून धरणी कधी भिजत नाही , 
अमृताचेही खरे नाही ,
सत्य फक्त पाणी आहे .
अन एवढे ज्याला कळले 
तो वेदांत्याहूनी ज्ञानी आहे 
कवी - विठ्ठल वाघ.
भाव, देव आणि धर्म हि तूच तू … !


Saturday 24 May 2014

भाग्यनगरचे "भाग्य " उजाडणार …

भाग्यनगरचे "भाग्य " उजाडणार … २६ मे २०१४ ला पाणी खानापूर तालुक्यातील भाग्य नगर तलावात …


Saturday 3 May 2014

टेंभू आणि महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण

टेंभू उपसा जल सिंचन योजना रखडली म्हणून एकूण तीन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्यात. शेतकरी संघटनेचे गोरख तावरे यांची हि त्या पैकीच एक. आता परवा तारीख 30 मे  2014 ला याबाबत सुनावणी झाली. त्यात या योजने बाबतचा निर्णय महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण यांच्या कडे सोपविला आहे. तसेच या प्राधिकरणा कडून जर तावरे यांचे समाधान झाले नाही तर ते खुशाल सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतील असे न्यायालयाने म्हटले आहे.

खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील लाभ क्षेत्रा बाहेरच्या



याच साठी सुरु आहे सगळा अट्टहास . . .
खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील लाभ क्षेत्रा बाहेरच्या गावांच्या समावेशासाठी तातडीने सर्वेक्षण करा
 आणि महिना भरात अहवाल सदर करा
- जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांचे आदेश.
मुंबईतील विशेष बैठकीत दिले आदेश - माजी आमदार अनिल बाबर, आर आर आबा यांची उपस्थिती

Tuesday 29 April 2014

आधी पतंगराव आणि आता आपले आबा !

आधी पतंगराव आणि आता आपले आबा !
मित्रांनो, आपल्या जिल्ह्यातील मंत्री हे राज्याचे मंत्री नसून ते केवळ मतदार संघाचे मंत्री आहेत अशी टीका अनेक वेळा केली जाते.
आता ही खालची बातमी वाचल्या नंतर तुम्हाला काय वाटते ?
काही कळले नसेल तर आणखी खुलासा करतो; मुळात टेंभू योजना ही केवळ खानापूर , आटपाडी आणि फार तर सांगोला तालुक्यां पर्यंत मर्यादित होती. तासगाव आणि कवठे महांकाळ चा समावेश त्यात मागाहून करण्यात आला. हा झाला जुना इतिहास. सुरुवातीला ज्या तालुक्यासाठी हि योजना तयार केली तो तालुका, म्हणजे खानापूर. कारण या योजनेचे जनक माजी आमदार अनिल बाबर हे
याच तालुक्यातील राहणारे. या तालुक्याचे दुर्दैव असे कि खानापूर सोडून आटपाडीला पाणी काही अंशी का होईना मिळू लागले आहे. तर तासगावला पाणी देण्यासाठीची विसापूर- पुनदी योजनेची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. राज्याचे गृहमंत्री आर आर आबा यांनी कवठे महांकाळ या आपल्या मतदार संघात टेंभू चे पाणी कसल्याही परिस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकी पूर्वी न्यायचेच असा चंग बांधला आहे. त्या दृष्टीने गेल्या दोन महिन्या पूर्वीच ढालगावला पाणी नेण्यासाठीचे नियोजन केले गेले. मुळ आराखड्यात नसलेल्या या ढालगाव आणि परिसराला पाणी देण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर त्याप्रमाणे आता योजनेच्या निविदा ही काढण्यात येणार आहेत. आचार संहिता संपल्या नंतर लगेच निविदा सुद्धा निघतील, आणि कडेगाव तालुक्यां प्रमाणेच ढालगाव सह कवठे महांकाळ तालुक्यातील जवळपास सगळे तलाव टेंभूच्या पाण्याने भरतील.
इकडे खानापूर तालुक्यात मात्र खानापूर - तासगाव हा मुळचा 105 किलो मीटरचा कालवा 41 किलो मीटर पर्यंत मर्यादित केला आहेच. शिवाय ज्या खानापूर तालुक्याच्या गोरेवाडी आणि कचरेवाडी या दोन कालव्यांची कामे 2002 पूर्वी सुरु झाली होती ती अद्याप 30 टक्के सुद्धा झालेली नाहीत. आता तर संपूर्ण तालुक्याला टेंभूचे पाणी मिळवून देण्याच्या नावाखाली या दोन्ही कालव्यांचे भवितव्य अधांतरी आहे. आणि तालुक्यातील उरलेल्या (म्हणजे मूळ आराखड्यात नसलेल्या) गावांचे जे सर्वेक्षण ढालगाव वगैरे गावांच्या सर्वेक्षणा बरोबर व्हायचे होते ते अद्याप सुरु सुद्धा झालेले नाही. एकूणच खानापूर तालुक्याला टेंभू चे पाणी देण्याचे नियोजन कागदावर सुद्धा दिसत नाही. परिणामी तालुकावासीयांवर मात्र केवळ हातावर हात ठेवून बघत बसायची वेळ आली आहे.
मग तुम्हीच सांगा आपल्या जिल्ह्यातील मंत्री हे राज्याचे मंत्री नसून ते केवळ मतदार संघाचे मंत्री आहेत ही टीका रास्तच नाही का ?






Monday 28 April 2014

खानापूर तालुक्यातल्या योजनेच्या कामांची काय अवस्था आहे ? 1

टेंभू योजनेच्या मूळ लाभधारक तालुक्यांत खानापूर तालुक्याचा समावेश आहे,  मात्र या योजनेची कामे सुरु होऊन तब्बल 16 वर्षे उलटल्या नंतरही
खानापूर तालुक्यातल्या योजनेच्या कामांची काय अवस्था आहे ?

Saturday 19 April 2014

टेंभू योजना आणि खानापूर घाटमाथा…

टेंभू योजनेच्या मूळ लाभधारक तालुक्यांत खानापूर तालुक्याचा समावेश आहे,  मात्र या योजनेची कामे सुरु होऊन तब्बल 16 वर्षे उलटल्या नंतर ही काय परिस्थिती आहे ?
टेंभू योजना आणि खानापूर घाटमाथा…

Friday 11 April 2014

टेंभू योजना 4 वर्षात पूर्ण करा - मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

टेंभू योजना 4 वर्षात पूर्ण करा - मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
भारत सरकार म्हणजेच  केंद्र सरकार 63 टक्के रक्कम घालेल तर महाराष्ट्र राज्याने 37 टक्के रक्कम घालावी.
केंद्र सरकारच्या वेग वर्धित सिंचन प्रकल्प अर्थात ए. आय. बी . पी . तअ आता टेंभू योजनेचा समावेश  कधी होऊ शकेल असे वाटत नाही. कारण आज रोजी हि योजना 50 टक्के सुद्धा पूर्ण झालेली नाही. शिवाय ए. आय. बी . पी च्या निकषांत हि योजना बसूच शकत नाही. म्हणून आता थेट मुंबई  उच्च न्यायालयाने आता हा असा तोडगा काढला आहे. 

टेंभू कालव्यावरील पूल कोसळण्याच्या स्थितीत

महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा फटका बसला -DATE - 11/04/2014.
टेंभू योजनेच्या मुख्य कालव्यावरील पूल कोसळण्याच्या स्थितीत.


केवळ तीन - चार वर्षापूर्वी या पुलाचे काम पूर्ण झाले आहे.

Monday 31 March 2014

खानापूर घाटमाथ्यावर कधी पाणी मिळणार ?


एकीकडे २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे, 
तर दुसरी कडे खानापूर तालुक्याच्या पूर्व गावांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
मागच्या तीन वर्षा पैकी  फक्त गेल्या वर्षी पाउस पडला. ज्या वेळी पाउस पडला त्यापूर्वी जलसंधारणेची कामे झाल्याने आणि बंधारे विशेषताः अग्रणी नदी पात्रातले नव्याने बांधलेले बंधारे  बऱ्यापैकी भरल्याने वाटले होते , आता किमान वर्ष भर पाणी टंचाई होणार नाही.
पण निसर्ग आणि त्या भागातल्या लोकांचा दुर्दैवाचा फेरा काही केल्या पाठ सोडायला तयार नाही. बंधारे केंव्हाच आटले, विहिरीही रिकाम्या होत आहेत कुपनलिकांचे पाणी खोल वर चालले  आहे. आणि ज्या एकमेव टेंभू योजनेचा भरवसा आणि त्या पाण्याच्या आशा लागून राहिल्येल्या आहेत ते टेंभूचे
 पाणी अद्याप कागदावर सुद्धा दिसत नाही…खानापूर घाटमाथ्यावरच्या गावांना आणि तिथल्या लोकांना कधी पाणी मिळणार ?
काय आहे नेमकी अवस्था टेंभू योजनेची ? आता ज्या पद्धतीने नियोजन आहे त्यातून तरी पाणी मिळेल का ? कुठवर काम झाले आहे ?
काय करताय सरकार, त्या सरकारचे मंत्री अधिकारी आणि नेते मंडळींचे काय चालले आहे ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे फक्त एका क्लिक वर
  महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील एखाद्या पाणी योजनेच्या समग्र माहितीसाठी वाहिलेला एकमेव ब्लॉग … http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/  (कृपया ब्लॉग च्या सगळ्या नव्या आणि जुन्या पोस्ट्स पहा)


Sunday 23 February 2014

एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, "बारमाही माणगंगा " हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही, हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, या भागातून जाणारया माणगंगा, अग्रणी आणि येरळा या तीन नद्यांचं भवितव्य यात सामावलं आहे. बारमाही माणगंगा हि एक मोहीम आहे, नद्या जिवंत आणि बारमाही वाहत्या करण्यासाठी चालवलेली. यात कोणा एकट्या दुकट्याची मते नाहीत तर अनेक ज्ञात- अज्ञात जाणकार तसेच रूढ अर्थाने अज्ञानी सुद्धा माणसांनी माणदेशातील नद्यांच्या पुनरुज्जीवना संदर्भात केलेला अभ्यास, मांडलेली मते, केलेले प्रयत्न आणि झालेले काम यांचा समावेश आहे. आपणही या चळवळीचा हिस्सा व्हा. प्रत्येक माणदेशी माणसाने आणि पाणी, पर्यावरण क्षेत्रात काम करणारयाने आवर्जून या व्यासपीठाचा वापर करावा. आपला, पत्रकार विजय लाळे, फेसबुक संपर्क - https://www.facebook.com/vijay.lale.5 मोबाईलवर - 8805008957. किंवा व्हाटस अप वर 7387296578. Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,: "बारमाही माणगंगा " हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही, हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसा...

एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी,


"बारमाही माणगंगा " हा केवळ एक ब्लॉग किंवा साहित्यिक लेख अगर बातम्यांचं दालन नाही,
हे एक व्यासपीठ माझ्या माणदेशातल्या लाखो लोकांसाठी, या भागातून जाणारया माणगंगा, अग्रणी आणि येरळा या तीन
नद्यांचं भवितव्य यात सामावलं आहे. बारमाही माणगंगा हि एक मोहीम आहे, नद्या जिवंत आणि बारमाही वाहत्या करण्यासाठी चालवलेली.
यात कोणा एकट्या दुकट्याची मते नाहीत तर अनेक ज्ञात- अज्ञात जाणकार तसेच रूढ अर्थाने अज्ञानी सुद्धा माणसांनी
माणदेशातील
नद्यांच्या पुनरुज्जीवना संदर्भात केलेला अभ्यास, मांडलेली मते, केलेले
प्रयत्न आणि झालेले काम यांचा समावेश आहे. आपणही या चळवळीचा हिस्सा व्हा.
प्रत्येक माणदेशी माणसाने आणि पाणी, पर्यावरण क्षेत्रात काम करणारयाने
आवर्जून या व्यासपीठाचा वापर करावा.
आपला,
पत्रकार विजय लाळे,
 फेसबुक संपर्क - https://www.facebook.com/vijay.lale.5
मोबाईलवर - 8805008957. किंवा व्हाटस अप वर 7387296578.

Thursday 20 February 2014

पण राजकारणाचा वेग, पाण्यापेक्षा जास्त

 आटपाडीत टेंभू चे पाणी पोहोचले हे खरे पण राजकारणाचा वेग, पाण्यापेक्षा जास्त आहे…कसा ते पहा



Wednesday 12 February 2014

पवारांचा फोन अन राष्ट्रवादी इन ! सौजन्य : दै. तरुण भारत

पवारांचा फोन अन राष्ट्रवादी इन !!! सौजन्य : दै. तरुण भारत
आज,  उद्या , परवा करता करता अखेरीस टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्याला देण्याचा मुहूर्त राज्य सरकारला सापडला. लोकसभेची आचार संहिता लागण्याच्या दोन चार दिवस आधीच्या या मुहुर्तामुळे आटपाडी तालुक्याला टेंभू चे पाणी मिळणार हे स्पष्ट झाले.
निवडणुकी पूर्वी राज्य सरकारात सामील असलेल्या दोन्ही राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी या मुळे नि:श्वास सोडला, पण त्यात हि राजकीय श्रेयासाठी भांडणार नाहीत तर ते राजकीय नेते कसले ?
 


हे हि नसे थोडके !

 हे हि नसे थोडके !
 अखेरीस टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्याकडे जाणार…
आज,  उद्या , परवा करता करता अखेरीस टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्याला देण्याचा मुहूर्त राज्य सरकारला सापडला. लोकसभेची आचार संहिता लागण्याच्या दोन चार दिवस आधीच्या या मुहुर्तामुळे आटपाडी तालुक्याला टेंभू चे पाणी मिळणार हे स्पष्ट झाले.
निवडणुकी पूर्वी राज्य सरकारात सामील असलेल्या दोन्ही राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी या मुळे नि:श्वास सोडला आहे.
शेतीसाठी पाणी देण्यासाठी तयार केलेल्या योजनेचे पाणी आताशा फक्त पिण्यासाठी म्हणून आटपाडीत दाखल होणार आहे,
कुठलाही अन्य पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नाही म्हणून हि टयांकर भरण्यासाठीची सोय सरकार कडून केली जात आहे.
काही का असेना वर्षानुवर्षे पाण्यासाठी तरसलेल्या आटपाडी तालुकावासीयाना पिण्यासाठी तरी पाणी मिळणार 

Saturday 1 February 2014

उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले

टेंभू योजनेला निधी द्या, करणे सांगू नका,
२० फेब्रुवारी पर्यंत निधी कसा देणार हे सांगा
उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले  


टेंभू चे पाणी १७ फेब्रुवारीला आटपाडी तालुक्यात येणार मंत्री पतंगराव कदम

 अखेर प्रतीक्षा संपणार ! टेंभू चे पाणी १७ फेब्रुवारीला आटपाडी तालुक्यात येणार…
 मंत्री पतंगराव कदम यांची घोषणा.
मुख्यमंत्री पृथ्वी राज चव्हाण येणार ; ४० हजार एकर ओलिताखाली येणार

Friday 24 January 2014

टेंभू बाबत जलसंपदा मंत्र्यांची घोषणा फसवी - अरुण माने

टेंभू बाबत जलसंपदा मंत्र्यांची घोषणा फसवी - अरुण माने
दि. १८ / ०१/२०१४

टेंभू ला 270 कोटी रुपये जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे

टेंभू ला  270 कोटी रुपये देणार ; जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांची घोषणा.
दि. ७ / ०१/२०१४

आंदोलनात पैशाची नको. . मूळ अन कट आर्टिकल

आंदोलनात पैशाची नको. . मूळ अन कट आर्टिकल



आंदोलनात पैशाची नको. . मूळ अन कट आर्टिकल