टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी बलवडी (खानापूर) च्या पठारावरून उतरणे आटपाडीत जाऊ शकेल असा दावा माजी सरपंच परशुराम गायकवाड यांनी केला आहे. त्यासाठी टेंभू योजनेचा टप्पा क्रमांक ३ ब आणि ४ वेजेगाव आणि टप्पा क्रमांक ५ भूड पंपग्रहाचे काम जर महाराष्ट्र शासनाचे अधिकारी १७ कोटीत पूर्ण होणार असेल तर केवळ ६ कोटीत पाणी उताराने आटपाडीत पोहोचू शकेल.
आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची,टेंभू योजनेची प्रत्येक बातमी घडामोड,प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष आणि सडेतोड मते.एखाद्या पाणी योजनेवरचा महाराष्ट्रातील किंबहुना देशातील बहुधा एकमेव अभ्यासपूर्ण ब्लॉग!