ढालगाव : ढालगावसह परिसरातील आठ गावांचा समावेश टेंभू योजनेच्या
लाभक्षेत्रात झाला आहे. याबाबतचे पत्र कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालकांना
प्राप्त झाले. त्याची प्रत आज माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत हाक्के
यांना मिळाली. त्यानंतर येथील कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली.
ढालगाव, शिंदेवाडी, कदमवाडी, ढोलेवाडी, चोरोची, जांभूळवाडी, चुडेखिंडी, दुधेभावी या आठ गावांचा टेंभू प्रकल्पांतर्गत व कवठेमहांकाळ कालव्याच्या लाभक्षेत्रात समावेश करण्याबाबत शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. तशा आशयाचे पत्र नुकतेच कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना प्राप्त झाले आहे. त्याची प्रत आज चंद्रकांत हाक्के यांनी कार्यकर्त्यांना दाखवताच कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली व आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी जि. प. सदस्य चंद्रकांत हाक्के, कुमार पाटील, बापूसाहेब खुटाळे, उपसरपंच अरविंद स्वामी, संजय पाटील, दौलत पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
ढालगावसह परिसरातील गावांना व घाटमाथ्यालाही पाणी मिळावे यासाठी सर्वपक्षीय आंदोलन केल्यानंतरच गृहमंत्री आर. आर. पाटील या भागाला पाणी देण्याचे अभिवचन दिले होते. ते पूर्ण झाल्याची भावना यावेळी हाक्के यांच्यासह कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. (वार्ताहर)ढालगावसह आठ गावे 'टेंभू'त समाविष्ट