लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Saturday, 6 September 2014

टेंभू के नाम पे . . . ?

टेंभू के नाम पे . . . ? 
मित्रांनो, टेंभू च्या नावावर आणखी एक चळवळ सुरु होत आहे. आता ती आटपाडीत नाही, तर खानापूर तालुक्यात. बळीराजा धरणाचे आद्य प्रवर्तक भाई संपतराव पवार आणि सतीश लोखंडे (वकील) यांच्या पुढाकाराने हि चळवळ सुरु होत आहे. 10 सप्टेंबर पासून त्याला मूर्त रूप येणार आहे म्हणे.  टेंभू च्या नावावर आज वर किती जणांनी किती वेळा आणि काय काय म्हणत चळवळी सुरु केल्या.  पण योजना काही पूर्ण व्हायचे नाव घेत नाही आणि पाणी काही मिळत नाही. तरीही प्रत्येकाच्या तोंडात टेंभू चे नाव असते. गेली  20  वर्षे इथले सगळे राजकारण या नावा भोवतीच फिरत आहे, मते देखील टेंभू च्या नावानेच मागितली जात आहेत. आता सुद्धा टेंभू भोवतीच येणारी विधानसभा आणि प्रचार फिरणार आहे हे स्पष्ट दिसत आहे. त्याचाच हा एक भाग असावा अशी शंका अनेक जन व्यक्त करीत आहेत. कारण सतीश लोखंडे याना डाव्या आघाडीचे उमेदवार म्हणून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. जनतेला (म्हणजे तुम्हा -  आम्हाला )  माय बाप सरकारने आजवर पाणी देतो म्हणून गंडवले. आता आपलेच म्हणवणारे परत एकदा टेंभू च्या पाण्याची आस दाखवत फसवणार… चालू दे 
 साला एक टेंभू … एक टेंभू योजना हैं जो पुरा होने का नाम नाही लेती / /
सो जब तक हैं ,  टेंभू …. राजकारण करनेवालोंको डरने कि ,
क्योंकी आखिर टेंभू के नाम पे .. . . हि तो आज तक हम लोग और राजकारन करणे वाले भी जिंदा हैं / /
चलो फिरसे शुरू हो जाओ … .

खानापूर घाटमाथ्यावर नेण्यासाठी आता आणखीन एक नवीन पर्याय देणार

टेंभू योजनेचे पाणी खानापूर घाटमाथ्यावर नेण्यासाठी आता आणखीन एक नवीन पर्याय  मांडण्यात येणार आहे…भाई संपतराव पवार आणि सतीश लोखंडे यांची माहिती.
टेंभू योजनेची प्रत्येक बातमी , प्रत्येक घडामोड , प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण, अत्यंत निष्पक्ष माहिती आणि सडेतोड मते फक्त

http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/

या ब्लॉग वर
कृपया नव्या जुन्या सर्व पोस्ट्स पहाव्यात.