लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Friday 11 April 2014

टेंभू योजना 4 वर्षात पूर्ण करा - मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

टेंभू योजना 4 वर्षात पूर्ण करा - मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
भारत सरकार म्हणजेच  केंद्र सरकार 63 टक्के रक्कम घालेल तर महाराष्ट्र राज्याने 37 टक्के रक्कम घालावी.
केंद्र सरकारच्या वेग वर्धित सिंचन प्रकल्प अर्थात ए. आय. बी . पी . तअ आता टेंभू योजनेचा समावेश  कधी होऊ शकेल असे वाटत नाही. कारण आज रोजी हि योजना 50 टक्के सुद्धा पूर्ण झालेली नाही. शिवाय ए. आय. बी . पी च्या निकषांत हि योजना बसूच शकत नाही. म्हणून आता थेट मुंबई  उच्च न्यायालयाने आता हा असा तोडगा काढला आहे. 

टेंभू कालव्यावरील पूल कोसळण्याच्या स्थितीत

महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा फटका बसला -DATE - 11/04/2014.
टेंभू योजनेच्या मुख्य कालव्यावरील पूल कोसळण्याच्या स्थितीत.


केवळ तीन - चार वर्षापूर्वी या पुलाचे काम पूर्ण झाले आहे.