लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Saturday 6 October 2018

मित्रांनो
 या फे
 पेजच्या माध्यमातून
मी सातत्याने टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या आराखड्यातील  आणि  एकूणच कामातील त्रुटींबाबत सातत्याने वेळोवेळी लिहीत आलो आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवत आलो आहे त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणून टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्याच्या पंप रहा बाबत मी या पंप आग्रहातून पाणी पळशी पर्यंत पोहोचू शकणार नाही असे सातत्याने लिहिले होते त्यानंतर आमदार अनिल भाऊ बाबर यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेत मी मांडलेल्या आणि लिहिलेल्या लेखन आणि बातम्यांच्या बाबतीत पुन्हा एकदा अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि नव्याने या टप्प्याचे सर्वेक्षण केले त्यानंतर माझे तर्क  आणि  अभियांत्रिकी माहिती  बरोबर ठरली  त्यातून  ही गोष्ट समोर आली की पाचव्या टप्प्यातून खानापूर घाटमाथ्यावरील फक्त काही गावे भिजू शकतात अन्य गावे टेंभूच्या पाण्याविना राहतील त्यानंतर भूड येथील पाचवा टप्प्याच्या पंप गृहाची उंची वाढवण्याचे आणि घाटमाथ्यावरील पळशी तसेच घाटनांद्रे तिसंगी पर्यंत हे पाणी देण्याबाबत चा नवा आराखडा तयार करण्यात आला
पत्रकारिता करीत असताना आपल्या भागाच्या आणि लोकांच्या हितासाठी काम करावे असे अपेक्षित असते मला वाटते माझ्या परीने ते योग्य प्रकारे सुरू असावे आता टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या पाचव्या टप्प्या च्या पंप गृहाची उंची 838 tu मीटर वरून 858 मीटर पर्यंत वाढविण्यात आली आहे........ धन्यवाद !