लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Monday, 9 June 2014

त्रांगडे टेंभू योजनेचे - धरण नाही, पाणी ही नाही आणि पुनर्वसनही नाही.

टेंभू उपसा जलसिंचन योजनेसाठी आरक्षित एकूण २२. १३ टि.एम. सी. (म्हणजे अब्ज घन फुट )पाण्यापैकी वांग - मराठवाडी धरणातून ०. ९७ टि.एम. सी.पाणी देण्यात येणार नियोजनात आहे. मात्र हे नियोजन योजना मंजूर होऊन तब्बल १८ वर्षे झाली तरी आज अखेर केवळ कागदावरच आहे. तसेच या धरणाचे प्रकल्पग्रस्त सध्या खानापूर तालुक्याच्या फोंड्या माळावर विस्थापितांचे जीवन जगत आहेत.
त्रांगडे टेंभू योजनेचे - धरण नाही, पाणी ही नाही आणि पुनर्वसनही नाही.

No comments:

Post a Comment