लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Sunday, 17 May 2015

आता हे आणखी एक गाजर : खासगीकरणातून या योजना पूर्ण करणार



आता हे आणखी एक गाजर : 
ताकारी , टेंभू , म्हैसाळ योजना निधी अभावी पूर्ण होत नाहीत त्यामुळे आता खासदार संजय पाटील यांनी खासगीकरणातून या योजना पूर्ण करण्यात येतील अशी घोषणा केली आहे. 
मुळात ज्यात फायदा आहे किंवा भविष्यात होण्याची शक्यता आहे अशा गोष्टीत कार्पोरेट किंवा खासगी कंपन्या पैसे गुंतवतात. या पाणी योजना मध्ये पैसे गुंतवून त्या कंपन्यांचा फायदा काय ? हा झाला एक प्रश्न…. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या योजना व्यवहार्य आहेत का ? हजारो कोटी रुपये घालून जर शेवटी जनतेचा रोषच पदरात पडणार असेल तर या योजनांत कोण पैसे घालील ?