लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Wednesday, 12 February 2014

हे हि नसे थोडके !

 हे हि नसे थोडके !
 अखेरीस टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्याकडे जाणार…
आज,  उद्या , परवा करता करता अखेरीस टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्याला देण्याचा मुहूर्त राज्य सरकारला सापडला. लोकसभेची आचार संहिता लागण्याच्या दोन चार दिवस आधीच्या या मुहुर्तामुळे आटपाडी तालुक्याला टेंभू चे पाणी मिळणार हे स्पष्ट झाले.
निवडणुकी पूर्वी राज्य सरकारात सामील असलेल्या दोन्ही राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी या मुळे नि:श्वास सोडला आहे.
शेतीसाठी पाणी देण्यासाठी तयार केलेल्या योजनेचे पाणी आताशा फक्त पिण्यासाठी म्हणून आटपाडीत दाखल होणार आहे,
कुठलाही अन्य पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नाही म्हणून हि टयांकर भरण्यासाठीची सोय सरकार कडून केली जात आहे.
काही का असेना वर्षानुवर्षे पाण्यासाठी तरसलेल्या आटपाडी तालुकावासीयाना पिण्यासाठी तरी पाणी मिळणार 

No comments:

Post a Comment