लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Saturday 3 May 2014

टेंभू आणि महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण

टेंभू उपसा जल सिंचन योजना रखडली म्हणून एकूण तीन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्यात. शेतकरी संघटनेचे गोरख तावरे यांची हि त्या पैकीच एक. आता परवा तारीख 30 मे  2014 ला याबाबत सुनावणी झाली. त्यात या योजने बाबतचा निर्णय महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण यांच्या कडे सोपविला आहे. तसेच या प्राधिकरणा कडून जर तावरे यांचे समाधान झाले नाही तर ते खुशाल सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतील असे न्यायालयाने म्हटले आहे.

खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील लाभ क्षेत्रा बाहेरच्या



याच साठी सुरु आहे सगळा अट्टहास . . .
खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील लाभ क्षेत्रा बाहेरच्या गावांच्या समावेशासाठी तातडीने सर्वेक्षण करा
 आणि महिना भरात अहवाल सदर करा
- जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांचे आदेश.
मुंबईतील विशेष बैठकीत दिले आदेश - माजी आमदार अनिल बाबर, आर आर आबा यांची उपस्थिती