लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Tuesday, 28 April 2015

झाला तेवढा टेंभू चा खेळखंडोबा पुरे



















टेंभू च्या पाण्यासाठी आता पुन्हा आंदोलन होणार =Daily Tarun Bharat, Sangli.28/04/2015
हे घ्या आता परत टेंभू साठी आंदोलन करु या असे  श्रमिक मुक्ती दलाचे भारत  पाटणकर म्हणत आहेत. मग गेली १८-२० वर्षे काय केलेत ? टेंभू योजनेचे आतापर्यंत जे काही वाटोळे झालेय ते याच मंडळींच्यामुळे जनतेला फसवायचे, खोट्या कल्पना मांडायच्या , सरकारी आधीकार्याना नियोजनाप्रमाणे काम करू द्यायचे नाही, राजकारण्यांची दिशाभूल करायची   आणि मग शेवटी लोकांची, जनमताची  भीती दाखवत वाट्टेल ते उद्योग करत आपले सो कॉल्ड समाजकारण साधायचे …. असलेच धंदे या लोकांनी केले. एकीकडे सरकार धरण बांधायला लागले तर धरणग्रस्तांना सरकार विरोधात आंदोलनाला उद्युक्त करायचे त्याच वेळी दुसरीकडे दुष्काळ ग्रस्तांना पाणी द्या म्हणून आंदोलने , चळवळी करायला लावायचे …. अरे धरणं बांधलीच नाहीत तर पाणी अडणार कसे ? आणि दुष्काळ ग्रस्तांच्या पर्यंत पोहोचणार तरी कसे ? आज वर असल्याच आंदोलन आणि चळवळीची भीती दाखवून सरकारला टेंभू योजना मूळ नकाशा प्रमाणे , आराखड्या प्रमाणे यांनीच करू दिली नाही. ज्याची फळे आज इथले सामान्य लोक भोगत आहेत… वाट्टेल तशी गावांची संख्या  वाढवायची ,वाट्टेल तिथे कालवे काढायला भाग पाडायचे , पंपगृहे उभा करायला लावायची… आपण जणू इंजिनिअर चे बाप आहोत अशा थाटात वागवायचे. त्यातूनच टेंभू चा सगळा बट्ट्या बोल करून ठेवला आहे… वाट्याला आलेले पाणी ठराविक , अडवायचे पाणी ठराविक मग योजना मंजूर  करण्याआधी , कामे सुरु करण्या  पूर्वी दुष्काळग्रस्त गावांच्या संख्येनुसार नियोजन करायचे ? का कामे सुरु झाल्यावर ? आता नव्याने  गावे वाढवल्याने सध्या समावेश असलेल्या गावांच्या वर आणि त्या लाभार्थींच्या वर अन्याय केल्या सारखे नाही होणार का ? शिवाय आता नव्याने पंप बसवण्यामुळे वाढणार्या पाणी पट्टी आणि वीज बिलांचे काय ? तो भुर्दंड कोण सहन करणार ? एकूणच सगळा गोंधळाचा प्रकार आहे… यावर एकाच उपाय … झाला तेवढा टेंभू चा खेळखंडोबा पुरे आता उरलेल्या भागासाठी तरी नवीन योजना हातात घ्या….नुसती आंदोलने करून  काही साध्य होणार नाही… सध्या जिथे पाणी पोहोचले आहे तेवढेच बास नाहीतर …?????