लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Saturday, 27 April 2013

विटा आणि आटपाडीच्या पत्रकारांवर खोटे गुन्हे

विटा आणि आटपाडीच्या
पत्रकारांवर खोटे गुन्हे

Updated at : 25-Apr-2013 07:52:15 PM | Tags :

पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्याना त्रास देण्याचे प्रकार राज्यात सर्वत्र सर्रास सुरू आहेत.या मालेतील ताजे बळी ठरले आहे.सिामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून पत्रकारिता करणारे विटा येथील पत्रकार विजय लाळे.

टेभू चे पाणी आटपाडीला मिळाले पाहिजे याची मागणी करण्यासाठी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ टेभू कार्यालय दोन येथे गेले होते.कराड येथे झालेल्या या चर्चेत अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरे दिली.आटपाडीला पाणी मिळणार नाही असेही त्यानी स्पष्ट केले.आपल्यावर दबाव आहे असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.कोणाचा दबाव आहे असे विचारल्यावर अधिकारी गप्प बसले.या प्रकारेमुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी हातात येईल त्याने मोडतोड सुरू केली.या घटनेनंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे गोपीचंद पडळकर यांनी झालेल्या प्रकाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत कार्यालय फोडायचे नाही तर अधिकाऱ्यांच्या सत्कार करायचा काय असे बाणेदार उत्तर दिले.तरीही टेभूचे कार्यकारी अभियंता तानाजी शेंडे यांनी पोलिसात तक्रार दिली.त्यात पत्रकार सतीश भिंगे आणि विजय लाळे या पत्रकारांच्या विरोधातही तक्रार दिली गेली.त्यानुसार पोलिसांनी 30 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.कार्यालयाची मोडतोड करणे.शासकीय कामात अडथळा आणणे ,बेकायदा जमाव जमविणे यासाराखे गुन्हे दाखल केले आहे.वस्तुतः भिंगे आणि लाळे हे बातमीसाठी गेले होते.मात्र यापूर्वी विजय लाळे यांनी टेंभू प्रकल्पाबाबत अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे.जनहित डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी केलेल्या लेखनामुळे शेंडे याचे काही हितसंंबंध दुखावले गेले असू शकतात.त्यातून केवळ लाळे यांना अद्दल घडविण्यासाठीच अन्य तीस जणांबरोबर लाळे आणि भिंगे यांची नावे घेतली आहेत.या प्रकरणाचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तीव्र शब्दात धिक्कार करीत असून कारण नसताना पत्रकारांवर दाखले केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी कृती समिती करीत आहे.या संदर्भात गृह मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे समिती निवेदन पाठवत आहे.
- See more at: http://www.batmeedar.com/articledetailshow.php?&id=374&cat=Latestnews#sthash.uZCdjOWl.G3F2H6oD.dpuf