लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Monday 31 March 2014

खानापूर घाटमाथ्यावर कधी पाणी मिळणार ?


एकीकडे २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे, 
तर दुसरी कडे खानापूर तालुक्याच्या पूर्व गावांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
मागच्या तीन वर्षा पैकी  फक्त गेल्या वर्षी पाउस पडला. ज्या वेळी पाउस पडला त्यापूर्वी जलसंधारणेची कामे झाल्याने आणि बंधारे विशेषताः अग्रणी नदी पात्रातले नव्याने बांधलेले बंधारे  बऱ्यापैकी भरल्याने वाटले होते , आता किमान वर्ष भर पाणी टंचाई होणार नाही.
पण निसर्ग आणि त्या भागातल्या लोकांचा दुर्दैवाचा फेरा काही केल्या पाठ सोडायला तयार नाही. बंधारे केंव्हाच आटले, विहिरीही रिकाम्या होत आहेत कुपनलिकांचे पाणी खोल वर चालले  आहे. आणि ज्या एकमेव टेंभू योजनेचा भरवसा आणि त्या पाण्याच्या आशा लागून राहिल्येल्या आहेत ते टेंभूचे
 पाणी अद्याप कागदावर सुद्धा दिसत नाही…खानापूर घाटमाथ्यावरच्या गावांना आणि तिथल्या लोकांना कधी पाणी मिळणार ?
काय आहे नेमकी अवस्था टेंभू योजनेची ? आता ज्या पद्धतीने नियोजन आहे त्यातून तरी पाणी मिळेल का ? कुठवर काम झाले आहे ?
काय करताय सरकार, त्या सरकारचे मंत्री अधिकारी आणि नेते मंडळींचे काय चालले आहे ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे फक्त एका क्लिक वर
  महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील एखाद्या पाणी योजनेच्या समग्र माहितीसाठी वाहिलेला एकमेव ब्लॉग … http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/  (कृपया ब्लॉग च्या सगळ्या नव्या आणि जुन्या पोस्ट्स पहा)