सोन्याची असते द्वारका ,
पोथ्या पुराणात सांगतात .
ऐकणाराच्या घराला लाकडाचेहि खांब नसतात.
पुराणातील वांगी चिरून भाजी कधी शिजत नाही,
वरुणाचा धावा करून धरणी कधी भिजत नाही ,
अमृताचेही खरे नाही ,
सत्य फक्त पाणी आहे .
अन एवढे ज्याला कळले
तो वेदांत्याहूनी ज्ञानी आहे
कवी - विठ्ठल वाघ.
भाव, देव आणि धर्म हि तूच तू … !