लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Friday 2 November 2012

माझी परखड मते ......श्वेतपत्रिका टेंभूची

टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्प , १९९६ मध्ये सुरु झालेला हा प्रकल्प आज १६ वर्ष रखडला आहे. ७०० कोटींचा हा प्रकल्प आज ४ हजार कोटींच्यावर पोहोचलाय. आतापर्यंत १४८९ कोटी रुपये खर्च झालेत आणि केवळ २७५ एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.  आतापर्यंत तीन विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका या योजनेच्या नावाखाली लढवल्या आणि जिंकल्या गेल्यात.  या भागात आलेला प्रत्येक बडा नेता किंवा मंत्री टेंभू चे नाव घेतल्याशिवाय आपले भाषण पूर्ण करत नाही. सत्ताधारी, विरोधक, डावे- उजवे सगळेच पक्ष टेंभू च्या नावावर मते मागतात, परंतू  ज्या आटपाडी, खानापूर, जत या दुष्काळी तालुक्यांसाठी हा तयार करण्यात आला. ते तालुके अद्यापही कोरडेच आहेत. शेवटी  काय होणार या प्रकल्पाचे ? हा पूर्ण होणार का ? झालाच तर कधी होणार ? अखेर काय चाललेय टेंभू च्या नावावर ?...या सगळ्या प्रश्नांची रोखठोक उत्तरे, आणि राजकारणा पलीकडे जावून केलेला अभ्यास आणि माझी परखड मते ......
श्वेतपत्रिका टेंभूची.....आजपासून दररोज वाचा http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/ या ब्लॉग वर आणि जरूर प्रतिक्रिया द्या.

टेंभू योजनेची पाणी आणि वीज बिल प्रती हेक्टरी काय असेल ?


महाराष्ट्राच्या जल संपदा विभागात नक्की काय चाललंय ? ७० हजार कोटी रुपये खर्च करून राज्याचा १ टक्का ही क्षेत्र भिजलेले नाही. ही वस्तुस्थिती असल्याचे खुद्द मुख्य मंत्रीच म्हणत असतील तर, नेमके  जल संपदा विभागाने पाणी सिंचनासाठी खर्च केलेले पैश्यांचे कोठे सिंचन केले ?  हा विषय सर्वांनीच गांभीर्यानं घेतला पाहिजे. कारण आपणही या न झालेल्या सिंचनाचा एक हिस्सा आहोत. कल्पना करा की गेल्या १०-१२ वर्ष पूर्वीच जर आपल्याला पाणी मिळाले असते. जर टेंभू योजना वेळीच पूर्ण झाली असती तर अशा दुष्काळाच्या परिस्थितीत आपल्याला राहावे लागले असते का ? टेंभू योजना न होण्यामागे काय करणे आहेत ? मेरी चे (मेरी , महाराष्ट्रातील सर्व इंजिनियर्सना प्रशिक्षण देणार्‍या संस्थेचे प्रमुख इंजिनियर आहेत. मेरी ही संस्था नाशिक येथे ४०० एकरच्या परिसरात वसलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व सरकारी इंजिनिर्सना येथे प्रशिक्षण दिले जाते. याच बरोबर श्री विजय पांढरे हे महाराष्ट्रातील सर्व धरणांच्या क्वालिटी आणि सेफ़टीची पहाणी करणार्‍या विभागाचे प्रमुख आहेत. मंत्रालयातील व विधानसभेतील जलसंसाधन विभागाशी निगडीत सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाब्दारी त्यांच्यावर सरकारने सोपवली आहे. ) मुख्य अभियंता विजय पांढरे (नाशिक)  म्हणतात त्या प्रमाणे खरेच उपसा सिंचन योजना या अ व्यवहार्य आहेत का ? राज्यातील एकही उपसा सिंचन योजना १०० टक्के यशस्वी झालेली नाही. किंबहुना एकही उपसा योजना आज स्वत : च्या हिकमतीवर कार्यरत नाही. आणि हिच जर वस्तुस्थिती असेल तर टेंभू चे भवितव्य काय ? 
उपसा सिंचन योजना म्हणजे, एका  भागाकडून पाणी उचलून दुसऱ्या भागाकडे नेणाऱ्या योजना. यात टेंभू चा समावेश आहे. आपली टेंभू ही पाच उचल टप्प्याची योजना आहे. ५ उचल टप्पा म्हणजे या टेंभू योजनेत पाच वेळा पाणी उचलून आणावे लागणार आहे.
ह्या उपसा असलेल्या योजना या जास्त वीज लागणाऱ्या असतात. त्या खर्चिक असतात, लोकांना त्या परवडणाऱ्या नाहीत,
आज ताकारी योजनेची काय अवस्था आहे हे लक्षात घेतले तर हेच स्पष्ट होते. आज सोनहिरा आणि केन अग्रो या दोन साखर मार्फत ताकारीची बिले काही अंशी तसेच बऱ्याच अंशी रक्कम ही राज्याच्या मदत आणि पुनर्वसन खात्याच्यावतीने भरण्यात येते.हे दोन्ही कारखाने त्यांच्या त्यांच्या कार्य क्षेत्रातील कालव्यांचे किंवा पाटा पुरतेच पाणी पट्टीचे आणि वीजेचे बील भरतात. या कारखानांचे चेअरमनच नेहमी सांगतात की उपसा सिंचनचे पाणी परवडत नाही. तरीही उपसा सिंचन योजनांचे अवास्तव महत्व वाढण्यात येत आहे.
 शिवाय टेंभू आणि ताकारी या दोन्ही योजनाच्या मधला भ्रष्ट आणि नियोजन शून्य कारभार पाहिला की ह्या योजना लोकांसाठी आहेत का अधिकारयांच्यासाठी आहेत हे समजतच नाही. टेंभू योजना तर नियोजन नसलेल्या आणि भ्रष्टाचाराचा आगर असलेली योजना असल्याचे आढळून येत आहे.
श्री विजय बळवंत पांढरे
टेंभू योजनेची माहिती घेतली तर हेच लक्षात येते.
टेंभू योजनेची माहिती घेतली तर हेच लक्षात येते. या योजनेमध्ये एकूण ८० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे आणि या योजनेची किंमत (पक्षि: एकूण अपेक्षित  खर्च )  आहे ४ हजार कोटी रुपये, विचार करा, एका हेक्टर मागे ५ लाख रुपये खर्च होणार आहेत. मग ही योजना पूर्ण झाली तर त्याची पाणी आणि वीज बिल प्रती हेक्टरी काय असेल ? विचार करा.
मग ही वस्तुस्थिती लक्षात घेतले तर असे वाटते, विजय पांढरे यांचे काय चुकले ?

BHAG 03

BHAG 02

BHAG 01