लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Tuesday 29 March 2016

जलयुक्त शिवार योजनेतला भ्रष्टाचार आणि गैर प्रकार

मित्रांनो , माझा आणखी एक अंदाज 

खरा होताना दिसतोय, 


लोकसत्ता पाठोपाठ आता सामना , 


जलयुक्त शिवार योजनेतला भ्रष्टाचार 

आणि गैर प्रकार लोकसत्ता पाठोपाठ 

सामना ने सुद्धा चिन्ता व्यक्त केली 

आहे… अग्रणी नदी पुनरज्जीवनाच्या 

कामांच्या बाबत मी जे आक्षेप घेतले,

तेच आता इथेही व्यक्त केले आहेत.

अग्रणी नदी पुनरज्जीवनाच्या कामांबाबत आक्षेप

मित्रांनो , माझा 

आणखी एक 

अंदाज खरा 

होताना 

दिसतोय, 

अग्रणी नदी 

पुनरज्जीवनाच्या 

कामांच्या बाबत मी जे आक्षेप घेतले,

तेच आता इथे तज्ञांनीही व्यक्त केले आहेत.
Daily Loksatta Dt. 28/03/2016

टेंभू चे पाणी अखेर २० वर्षांनी गार्डीत पोहोचले ….

टेंभू चे पाणी अखेर २० वर्षांनी गार्डीत पोहोचले ….
साळशिंगेची हद्द ओलांडून गार्डी हद्दीत पाण्याने प्रवेश करताच गार्डीकरांच्या आनंदाला पारावर उरला नाही. ज्या क्षणाची आम्ही डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होतो, तो क्षण आज आला. जणू सोनियाचा दिनू आज अमृते पाहिला अशी स्थिती गार्डीतल्या प्रत्येकाची झालेली आहे. अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. कालव्यातून पाणी वेगाने पुढे जात आहे. कुणी दुचाकीवरून, कुणी चार चाकी गाडीतून, कुणी पळतपळत तर कुणी अक्षरश: उड्या मारत पाण्याबरोबर पळत निघाले होेते.
 Dainik Pudhari 29/23/2016.

Friday 4 March 2016

बारमाही माणगंगा अभ्यास पथकाची टीका

पाणी पोहोचून सुद्धा आटपाडी तालुक्यांतील शेतकरी 

टेंभू च्या पाण्यापासून वंचित …

 बारमाही माणगंगा अभ्यास पथकाची टीका. 


Tembhu Update ....


3/03/2016