लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Tuesday, 26 April 2016

टेंभू चे पाणी अग्रणीत सोडायचीच घाई का ? कशासाठी ?

खानापूर घाट माथ्याला टेंभू च्या ४ आणि ५ व्या टप्प्यांचा काय फायदा ?
जो पर्यंत कचरेवाडी आणि गोरेवाडी हे दोन कालवे पूर्ण होत नाहीत , 
तसेच  अद्याप टेंभू च्या लाभ क्षेत्रा बाहेर असलेली उर्वरित १८ गावे टेंभू योजनेत समाविष्ट होत नाहीत तो पर्यंत 
खानापूर घाट माथ्याला टेंभू च्या ४ आणि ५ व्या टप्प्यांचा काय फायदा ?
टेंभू चे पाणी अग्रणीत सोडायचीच घाई का ? कशासाठी ? हे आता सगळ्या लोकाना समजायला लागले आहे … 

Saturday, 23 April 2016

राज्यातील अपूर्ण पाणी योजनांसाठी 50 हजार कोटींचे कर्ज - गिरीश महाजन

राज्यातील अपूर्ण पाणी योजनांसाठी 50 हजार कोटींचे कर्ज - गिरीश महाजन 
     अपूर्ण पाणी योजना पूर्ण करण्यासाठी प्रसंगी शासन 50 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढेल, मात्र पुढच्या दोन वर्षांत कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचवू, अशी ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. टेंभू योजनेच्या टप्पा क्रमांक 4 आणि 5 च्या उर्वरित कामांचा प्रारंभ शुक्रवारी ना. महाजन यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, गेल्या 15 वर्षांपासून बंद असलेली टेंभूची ही कामे आज आम्ही सुरू करीत आहोत. पाणी योजना अपूर्ण राहण्यास राज्याचे एकूण अंदाजपत्रकच कारणीभूत आहे. एक तर 7 ते 8 हजार कोटींपेक्षा जास्त या खात्याला निधी देता येत नाही आणि दुसरे म्हणजे राज्यांतर्गत असलेला अनुशेष; परंतु आता यावर मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि आम्ही मिळून मार्ग काढला आहे.
अनुशेषाचे काय या प्रश्‍नावर ना. महाजन म्हणाले, आता विदर्भातील वाशिम, अकोला, अमरावती आणि बुलडाणा या चारच जिल्ह्यांचा अनुशेष भरून काढायचा राहिला आहे. बाकीकडचा बहुतांश अनुशेष भरून निघाला आहे. अनुशेषाच्या बाबतीत राज्यपालांच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊ. त्यासाठी आवश्यकता असल्यास त्यांचेही मत घेऊ; परंतु येत्या दोन वर्षात सगळ्या अपूर्ण सिंचन योजना आम्ही पूर्ण करणार आहोत.
ते म्हणाले, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत यावर्षी महाराष्ट्रातील सात प्रकल्प समाविष्ट झाले आहेत. या प्रकल्पांना केंद्र सरकार 60 टक्के तर राज्य सरकार 40 टक्के निधी देणार आहे. त्याचा वाटा राज्याने काढून ठेवला आहे. त्याच वेळी जी रक्कम सरप्लस होईल ती पाणी योजनांसाठीच खर्च केली जाईल. या केंद्राच्या योजनेत पुढच्या वर्षी आणखी 13 प्रकल्पांचा समावेश करण्यात येईल.
टेंभू योजनेच्या नियेाजनाच्या चुका व वेजेगाव तलावाचा मुद्द्यावर मंत्री महाजन यांनी तत्काळ या सूचनेकडे गांभीर्याने पहा आणि ती दुरुस्त करून घ्या, असे अधिकार्‍यांना आदेश दिले तसेच खासदार संजय पाटील यांनीही हा मुद्दा बरोबर असून चुका दुरुस्त करून घेऊ, असे सांगितले. 
सांगलीतील पाणी लातूरकरांसाठी दिले मात्र सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळाकडे राज्य शासन गांभिर्याने पहात नाही असा आरोप केला जात आहे या आरोपाबाबत ते म्हणाले,तसे काही नाही. राज्य शासनाला सर्व जिल्हे सारखेच आहेत. दुजाभाव केलेला नाही आणि होणारही नाही.
Sunday, 10 April 2016

सांगोला तालुक्यात शेती साठी तलावाचे पाणी मीटर पद्धतीने

सांगोला तालुक्यात शेती साठी तलावाचे पाणी मीटर 

पद्धतीने 


शेती ला मीटर लावून पाणी देणे , हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग 

दुष्काळी सांगोला तालुक्यात प्रथमच यशस्वी होत आहे . 


जुनोनी तलावावर १०० टक्के मीटर जोडून टेंभू योजनेचे पाणी शेतात 

नेले जात आहे . तेथील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन द्वारे शेतीला पाणी 

दिले जात आहे. 
सविस्तर वृत्त पहा दैनिक सामना , पुणे 
ता . २ एप्रिल २०१६

Monday, 4 April 2016

भरण कालव्याचे ठिकाण बदलले तरच वेजेगाव तलाव पूर्ण भरू शकेल

टेंभू योेजनेची कामे गतीने -
 (विजय लाळे यांच्या ब्लॉग वर पहा टेंभू चे अपडेट्स ) ….
टेंभूच्या खानापूर - तासगाव कालव्याच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले तर पारे भागापर्यंत पाणी पोहोचेल. तसेच 4 थ्या टप्प्याच्या निविदा निघाल्या आहेत. लवकरच पंपगृहाच्या कामाला सुरूवात होईल. एकूणच खानापूर तालुक्यात टेंभू योेजनेची कामे गतीने सुरू आहेत.
खानापूर तालुक्यात सरत्या आठवड्याच्या सुरुवातीला करंज ओढ्यात पाणी सोडल्याने गार्डी, घानवड आणि हिंगणगादे गावांच्या परिसरापर्यंत पाणी पोहोचले आहे. माहुली पंपगृहातून तिसर्‍या ब टप्प्यातून हे पाणी खानापूर ते तासगाव कालव्यात सोडले होते. त्यातून भाग्यनगर तलावातही पाणी सोडण्यात आले. परंतु हा कालवा एकूण 41 किलोमीटर अंतराचा आहे. माहुली ते पारे गावच्या शिवेपयर्ंत हा कालवा आहे.
या अंतरातल्या विट्या जवळच्या बोगद्याचे काम अपूर्ण आहे. विटा - साळशिंगे रस्त्यावरील आयटीआय च्या टेकापलिकडून हा बोगदा सुरू होतो ते थेट शिवमल्हार हिल्स म्हणजे, सुळकाईच्या डोंगराच्या पायथ्याच्या कदम वस्तीपयर्र्ंत. एकूण उत्‍तर-दक्षिण असलेल्या या बोगद्याचे एकूण अंतर सव्वा दोन किलो मीटर अर्थात 2 हजार 270 मीटर इतके आहे. या बोगद्याच्या दोन्ही बाजूंकडून गेल्या 6 वर्षांपासून कामे सुरू आहेत.
गेल्या दीड वर्षात गती घेतल्यांनतर आता आजअखेर एकूण 355 मीटरचे काम अपूर्ण आहे. हे काम 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन आमदार अनिलराव बाबर यांनी दिले आहे. यातल्या उत्‍तरेकडचे काम बर्‍यापैकी पूर्ण झाले आहे. परंतु दक्षिणेकडून आतल्या भागाचे काम सध्या दिवसामागे 2 ते 3 मीटर इतकेच होत आहे.
दक्षिणेकडून बोडरे वस्तीच्या अलिकडच्या भागातून जॅक सपकाळ यांच्या शेताजवळून हा बोगदा सुरू होतो. जवळपास 1 हजार 100 मीटर पर्यंतच्या पुढे आत काम झालेले आहे. आत पाणी आणि हवा पोहोचण्यासाठी स्वतंत्र पाईप्स टाकल्या असल्या तरी अत्यंत कोंदट, उष्ण असे वातावरण आहे. काही ठिकाणाहून पाण्याचे पाझर सुरू आहेत. त्यातच एकदा तीन ते चार जिलेटीनचे स्फोट घेतल्यानंतर आतला धूळ आणि तयार झालेला वायू बाहेर जाण्यासाठी (म्हणजेच मकींगसाठी) किमान 5 ते 6 तास लागत आहेत. त्यांनतर आतले उडालेले दगड, कपर्‍या बाहेर काढण्यात येतात.
वेजेगाव पंपगृह, टप्पा क्रमांक 4 च्या पंपगृहाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच वर्क ऑर्डर निघून कामे सुरू होतील. सुरुवातीला वेजेगाव तलाव भरून घेण्याचे नियोजन आहे, असे आमदार बाबर यांनी सांगितले आहे परंतु ज्या माहुली ते घाणंद मुख्य कालव्याला टप्पा क्रमांक 4 चा भरण कालवा जोडायचा आहे, त्या ठिकाणी मुख्य कालवा खाली आणि वेजेगाव तलाव वर अशी स्थिती आहे. त्यामुळे भरण कालव्याचे ठिकाण बदलले तरच वेजेगाव तलाव पूर्ण भरू शकेल, अन्यथा सध्याच्या नियोजनाप्रमाणे वेजेगाव तलावाच्या आग्‍नेय दिशेला असणार्‍या वरच्या बाजूकडील पंपगृहाकडे पाणी पोहोचू शकेल.

Sunday, 3 April 2016

आटपाडी आणि कडेगाव तालुक्यात आंदोलनेआटपाडी आणि कडेगाव तालुक्यात हि काल टेंभू योजनेचे पाणी मिळावे म्हणून आंदोलने
पहिल्यांदा कडेगाव … 
येथील ल. पा. तलावात टेंभू चे पाणी सोडावे अशी लोकांची मागणी होती , सध्या या तलावात पाणी सोडण्याचे कसलेही नियोजन नसताना देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कडून चालू वर्षीच्या ऊस बिलातून या आवर्तनाचे पैसे कपात करून घेतले आहेत . पाणी पट्टी भरूनही आम्हाला पाणी का दिले जात नाही असा सवाल शेतकरी विचारत आहेत. आंदोलन झाल्या नंतर जल संपदा विभागाचे शाखा अभियंता दीपक निर्मळे  यांनी  सध्या कामथी (ता कराड) कालव्याचे रोटेशन सुरु आहे त्यानंतर गुढी पाडव्याला तुम्हाला पाणी देण्यात येईल असे उत्तर दिले आहे …. 
कडेगाव तालुक्याने टेंभू च्या पाण्याचा आतापर्यंत चिक्कार लाभ अगदी फुकट घेतला आहे , आताही केवळ दांड पणा करून माझे ते माझेच आणि दुसर्याचे ते हि माझेच असे धोरण सुरु ठेवले आहे … यां तालुक्याला सर्वात जास्त पाणी मिळाले आहे , पारंपारिक पिक पद्धती सोडून या तालुक्याने केवळ ऊस शेती सुरु केल्याने अमाप पाणी लागते. त्या मुळे सतत पाणी असूनही पाणी नाही म्हणून इथलेच  लोक बोंब ठोकतात …. पुढे पाणी चालले कि या मंडळींच्या पोटात दुखते कि काय कोणास ठाऊक ? आणि सर्वात कडी म्हणजे इथे सगळ्याच पक्ष्याचे सगळेच राजकीय पुढारी  पाणी पळवण्यात पटाईत आहेत असे एकूण चित्र आहे. 
आता आटपाडी च्या आंदोलनाविषयी -
श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन लॉंग मार्च नावाने आटपाडी ते कराड असे झाले…सांगोला , आटपाडी या शेपटा कडच्या भागा  अगोदर  खानापूर तालुक्यात भाग्य नगर तलाव आणि करंज ओढ्याला पाणी का सोडले ? असा जाब म्हणे मोर्चे करांनी कार्यकारी अभियंता तानाजी जेंगटे याना विचारला … खानापूर तालुक्याला दिलेले पाणी हा चोरीचा प्रकार आहे असे त्यांचे मत होते …. हे म्हणजे अति झाले … खानापूर तालुक्याला पाणी दिले ते हि फुकटात दिलेले नाही कोणीतरी (पैसे कोणी भरले त्यांची नावे पुढच्या वेळी नक्कीच जाहीर केली जातील ) पाणी पट्टी आधीच भरली नंतरच पाणी आलेले आहे … ते पाणी चाचणी साठी म्हणून करंज ओढ्यात सोडले आहे. भाग्यनगर चे आवर्तन नियम प्रमाणेच आहे… आणि हाच निकष लावायचा तर दोन वर्षांच्या पूर्वी आटपाडीत आलेले पाणी सुद्धां असेच नियम मोडून आले होते . तेंव्हा या  मंडळींनी उगाच आटपाडी करांना भूल थापा देवू नये. 

  टेंभू योजनेची प्रत्येक बातमी , घडामोड , सर्वात आधी , 
अगदी निर्भीड, नि : ष्पक्ष …. सडेतोड वृत्ते, विश्लेषण आणि अभ्यास पूर्ण माहिती …
राहा अपडेट माझ्या बरोबर … पत्रकार विजय लाळे. 
फेसबुक पेज आणि ब्लॉग 

चितळी जवळ टेंभू चे दारच उखडले !

चितळी जवळ टेंभू चे दारच उखडले !


दैनिक पुढारी , ३/०३/२०१६

टेंभू योजनेची प्रत्येक बातमी , घडामोड , सर्वात आधी 

अगदी निर्भीड, नि : ष्पक्ष …. सडेतोड वृत्ते, विश्लेषण 

णि अभ्यास पूर्ण माहिती …

फेसबुक पेज Failure Of Tembhu Water Lifting 

Scheme https://www.facebook.com/Failure-

Of-Tembhu-Water-Lifting-Scheme-

570277833114360/info/?tab=page_info

आणि 

ब्लॉग http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/

राहा अपडेट माझ्या बरोबर … पत्रकार विजय लाळे.

Saturday, 2 April 2016

महाराष्ट्र सरकार ची कृष्णा खोरे बाबत सापत्न भूमिका - आमदार अनिलराव बाबर

महाराष्ट्र सरकार ची कृष्णा खोरे बाबत सापत्न भूमिका , करोडो रुपये विदर्भ , मराठ वाड्याला द्यायला आमची हरकत नाही पण आमच्या हक्काचे पैसे तरी आम्हाला द्या - आमदार अनिलराव बाबर  विधानसभेत आक्रमक 
Daily Pudhari 30/03/2016

टेंभू च्या कालवा दुरुस्तीचे काम घानवड जवळ पूर्ण -

टेंभू च्या कालवा दुरुस्तीचे काम घानवड जवळ पूर्ण - हिंगणगादे  कडे आज पाणी सोडणार ; आमदार बाबर. 
आठ तासांत फोडलेला कालवा पूर्ववत केला ; टेंभू च्या अधिकाऱ्यांचे आभिनंदन  आणि आभार 

Friday, 1 April 2016

घानवडच्या हद्दीत टेंभूचा कालवा फोडला

 घानवडच्या हद्दीत टेंभूचा कालवा फोडला. 

पंप बंद : गार्डीकरांचा आनंद २४ तासच टिकला : हिंगणगादेकरांचाही 

हिरमोड 

Daily Pudhari - 1 /04/2016.


टेंभू चे पाणी विट्यात १५ मे पर्यंत - आमदार बाबरटेंभू चे पाणी विट्यात १५ मे पर्यंत : 


तर खानापूरचे लोक दिवाळीची अंघोळ टेंभू 

च्या  पाण्याने करतील - आमदार बाबर 
Daily Pudhari - 31 March 2016.