लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Saturday, 30 January 2016

नेवरी परिसराला टेंभूचे पाणी देणार - देशमुख

कडेगाव तालुक्यातील नेवरी परिसराला टेंभू चे पाणी देणार ; 
पृथ्वीराजबाबा देशमुख यांची घोषणा 
यावर माझे भाष्य -  ज्या लोकांच्या साठी हि योजना तयार करण्यात आली त्यांचे नेमके काय करायचे हे एकदा ठरवा आणि मग वाट्टेल तिथे पाणी न्या. बाकी आमचे काही म्हणणे नाही. 

Tembhu L I S Vs Takari L I S

टेंभू आणि वाद यांचे जणू पहिल्या पासूनचे नाते आहे … आता टेंभू योजना विरुद्ध ताकारी योजना असा वाद लवकरच सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत 
दि २८ /०१/२०१६ ची दैनिक पुढारी ची पहा हि बातमी 

टेंभू योजनेच्या ४ थ्या टप्प्याची निविदा - आमदार अनिलराव बाबर

घाणंद एक्स्प्रेस कालव्याला भिकवडी येथे गेट

टेंभू योजने च्या तिसरया अ टप्प्याला म्हणजे माहुली ते घाणंद एक्स्प्रेस कालव्याला भिकवडी येथे गेट केल्यास वळखड , माहुली आणि चिखल होळ या तीन गावांना पाणी उताराने मिळू शकेल… त्या दृष्टीने खासदार संजयकाका  पाटील , माजी आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख यांनी काल या कामाचे भूमीपूजन केले. दि . २४ जानेवारी २०१६.