लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Tuesday, 28 April 2015

झाला तेवढा टेंभू चा खेळखंडोबा पुरेटेंभू च्या पाण्यासाठी आता पुन्हा आंदोलन होणार =Daily Tarun Bharat, Sangli.28/04/2015
हे घ्या आता परत टेंभू साठी आंदोलन करु या असे  श्रमिक मुक्ती दलाचे भारत  पाटणकर म्हणत आहेत. मग गेली १८-२० वर्षे काय केलेत ? टेंभू योजनेचे आतापर्यंत जे काही वाटोळे झालेय ते याच मंडळींच्यामुळे जनतेला फसवायचे, खोट्या कल्पना मांडायच्या , सरकारी आधीकार्याना नियोजनाप्रमाणे काम करू द्यायचे नाही, राजकारण्यांची दिशाभूल करायची   आणि मग शेवटी लोकांची, जनमताची  भीती दाखवत वाट्टेल ते उद्योग करत आपले सो कॉल्ड समाजकारण साधायचे …. असलेच धंदे या लोकांनी केले. एकीकडे सरकार धरण बांधायला लागले तर धरणग्रस्तांना सरकार विरोधात आंदोलनाला उद्युक्त करायचे त्याच वेळी दुसरीकडे दुष्काळ ग्रस्तांना पाणी द्या म्हणून आंदोलने , चळवळी करायला लावायचे …. अरे धरणं बांधलीच नाहीत तर पाणी अडणार कसे ? आणि दुष्काळ ग्रस्तांच्या पर्यंत पोहोचणार तरी कसे ? आज वर असल्याच आंदोलन आणि चळवळीची भीती दाखवून सरकारला टेंभू योजना मूळ नकाशा प्रमाणे , आराखड्या प्रमाणे यांनीच करू दिली नाही. ज्याची फळे आज इथले सामान्य लोक भोगत आहेत… वाट्टेल तशी गावांची संख्या  वाढवायची ,वाट्टेल तिथे कालवे काढायला भाग पाडायचे , पंपगृहे उभा करायला लावायची… आपण जणू इंजिनिअर चे बाप आहोत अशा थाटात वागवायचे. त्यातूनच टेंभू चा सगळा बट्ट्या बोल करून ठेवला आहे… वाट्याला आलेले पाणी ठराविक , अडवायचे पाणी ठराविक मग योजना मंजूर  करण्याआधी , कामे सुरु करण्या  पूर्वी दुष्काळग्रस्त गावांच्या संख्येनुसार नियोजन करायचे ? का कामे सुरु झाल्यावर ? आता नव्याने  गावे वाढवल्याने सध्या समावेश असलेल्या गावांच्या वर आणि त्या लाभार्थींच्या वर अन्याय केल्या सारखे नाही होणार का ? शिवाय आता नव्याने पंप बसवण्यामुळे वाढणार्या पाणी पट्टी आणि वीज बिलांचे काय ? तो भुर्दंड कोण सहन करणार ? एकूणच सगळा गोंधळाचा प्रकार आहे… यावर एकाच उपाय … झाला तेवढा टेंभू चा खेळखंडोबा पुरे आता उरलेल्या भागासाठी तरी नवीन योजना हातात घ्या….नुसती आंदोलने करून  काही साध्य होणार नाही… सध्या जिथे पाणी पोहोचले आहे तेवढेच बास नाहीतर …?????

Thursday, 23 April 2015

नव्याने नियोजन करताना संपूर्ण भागाचा आणि गावांचा विचार करा

टेंभू योजनेच्या सध्याच्या आराखड्यातून तब्बल १०० हून अधिक गावे वंचित राहत आहेत. आता नव्याने नियोजन करताना त्या संपूर्ण भागाचा आणि गावांचा विचार प्राधान्याने करायला पाहिजे अन्यथा. . कालवे वळविणे आणि लिफ्ट ची संख्या वाढवणे एवढाच उद्योग करत बसावे लागेल… 

Sunday, 19 April 2015

मग काय होणार या 110 वंचित गावांचे ?

टेंभू योजनेच्या सध्याच्या आराखड्यात सातारा , सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १०० हून अधिक गावे नाहीतच… या वंचित  गावांचा समावेश या योजनेत समाविष्ट झाल्याशिवाय या भागातला दुष्काळ पूर्णपणे हटणार नाही. कारण  या दुष्काळी पट्ट्यात  आता नवीन दुसरी कोणतीही योजना राबवणार नाही असे धोरण महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहे. मग काय होणार या वंचित गावांचे ???  

Friday, 17 April 2015

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी जागतिक बँकेचे साहाय्य घेणार - गिरीश महाजन

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी जागतिक बँकेचे साहाय्य घेणार


गिरीश महाजन यांची माहिती (दैनिक लोकसत्ता ) १८/०४/२०१५

वार्ताहर, सांगली

राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकरकमी निधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या चार महिन्यांत निर्णय घेतला जाणार असून, यासाठी जागतिक बँकेकडून अर्थसाहाय्य घेण्याची शासनाची तयारी असल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी केले. म्हैसाळ योजनेच्या डोंगरवाडी प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर भोसे येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.
राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७० हजार कोटींची गरज आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सिंचन विभागासाठी जास्तीतजास्त साडेसात हजार कोटींची उपलब्धता होऊ शकते. नसíगक वाढीनुसार अपूर्ण प्रकल्पाचा खर्च दिवसेंदिवस वाढतच जात असल्याने उपलब्ध निधीतून सिंचन प्रकल्प पूर्ण होणे कठीण आहे. यामुळे जागतिक बँक अथवा वित्तीय संस्थेकडून एकरकमी पसे उपलब्ध करून देऊन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. प्रकल्पासाठी पसे उपलब्ध करीत असतानाच शासन, बँक आणि ठेकेदार यांच्यात वेळेचा करार करण्यात येणार आहे. तसा निर्णय येत्या चार महिन्यांत घेण्यात येईल असे महाजन यांनी सांगितले.
या वेळी महाजन म्हणाले, की जलसंपदा विभागात झालेल्या भ्रष्टाचाराची लाचलुचपत विभागामार्फत ही चौकशी करण्यात येत आहे. कोणीही कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. लाचलुचपत विभागाला चौकशीसाठी लागणारी कागदपत्रे सध्या उपलब्ध करून देण्यात आली असून, कोकणातील १२ आणि विदर्भातील ३ प्रकल्पांची चौकशी सध्या सुरू आहे. 
राज्याच्या वाटय़ाचे पाणी निश्चित झाले असून उपलब्ध पाण्यावरच सिंचन क्षेत्र वाढविणे गरजेचे असल्याने ठिबक सिंचन सक्तीचे करावे लागणार आहे  असे सांगून महाजन म्हणाले, की अपूर्ण योजना पूर्ण करणे ही शासनाची जबाबदारी असून, शेती व्यवसाय शाश्वत होण्यासाठी शासन प्रयत्न करेल.
या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, की दुष्काळाचे कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी सिंचन योजना पूर्ण करण्याबरोबरच जलयुक्त शिवार ही संकल्पना शासनाने हाती घेतली असून, शेतीसाठी शाश्वत सिंचन व्यवस्था उपलब्ध करण्याची शासनाची जबाबदारी आहे. पाणी योजना पूर्ण करण्याकडे काँग्रेस व राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत त्यामुळेच हे प्रकल्प रखडले. विदर्भासाठी जादा निधी दिला जात असल्याचा आरोप होत असला तरी अनुशेष दूर केला जात असून अपूर्ण प्रकल्पासाठी अनुशेषाचा मुद्दा उपस्थित होत नाही. यापुढील काळात जयंत पाटील व पतंगराव कदम यांना घरी बसविण्याचे काम येथील लोकच करतील असा विश्वास व्यक्त करून शिवतारे यांनी पतंगराव म्हणजे एक जोकर असल्याची टीका केली.
या वेळी खा. संजयकाका पाटील, आ. उल्हास पाटील, आ. सुरेश खाडे व माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमास आ. शिवाजीराव नाईक, आ. अनिल बाबर, आ. सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विकास सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

टेंभू योजना पूर्णत्वास येणार = भाजपाचे गणेश देसाई यांचे मत

टेंभू योजना पूर्णत्वास येणार = भाजपाचे गणेश देसाई यांचे मत 

Wednesday, 15 April 2015

लाभ क्षेत्रा बाहेरच्या त्या ४६ गावांचे काय ?लाभ क्षेत्रा बाहेरच्या त्या ४६ गावांचे काय ? 
20 वर्षां पूर्वी जो संपूर्ण टेंभू योजनेचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यातून खानापूर , आटपाडी , तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यातील एकूण 46 गावे त्या आराखड्यात घेतलेली नाहीत. आता या गावांचे काय होणार हा प्रश्नहि सध्या ऐरणीवर आलेला आहे…  

Tuesday, 14 April 2015

" वाट पाहून टेंभू ची , डोळे थकले थकले "


टेंभू आणि आम्ही

" वाट  पाहून टेंभू ची ,
 डोळे थकले थकले "

कवी - मनोज देवकर 

Monday, 13 April 2015

आता तासगावचा संबंधच नाही ; मग कालव्याचे नाव खानापूर - तासगाव कां ?आता तासगावचा संबंधच नाही ; मग कालव्याचे नाव खानापूर - तासगाव कां ?
खानापूर - तासगाव कालवा … टेंभू योजनेच्या सुरुवातीच्या आराखड्यात हा कालवा १०६ किलो मीटर अंतराचा होता. परंतू मध्येच गेल्या दोन वर्षा पूर्वी तासगाव तालुक्यातील टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रातील गावांना पाणी देण्यासाठी राज्य सरकारने विसापूर - पुणदी उपसा सिंचन योजना निर्माण केली. टेंभू योजनेच्या टप्पा क्रमांक २ नंतर खंबाळे बोगद्यातून पाणी सुर्ली घाटावर आल्यानंतर आरफळ कालव्यात टेंभू योजनेचे पाणी उताराने सोडून बंदिस्त पाईप लाईन द्व्यारे पेड तलावापर्यंत आणण्याचे नियोजन विसापूर - पुणदी उपसा सिंचन या योजनेत  आहे. परंतू माहुली नंतर  टप्पा क्रमांक ३ मध्ये जो खानापूर -तासगाव कालवा होता तो ४२ किलोमीटर अंतरापर्यंतच मर्यादित करण्यात आला. त्या मुले आता तासगावचा आणि या कालव्याचा अर्थअर्थी संबंध उरलेला नाही…. या कालव्याचे सध्या काय सुरु आहे ? ते प्रत्यक्ष वाचा…. 

Saturday, 11 April 2015

२०१५-२०१५ साठी फक्त १५२ कोटींचे नियोजन

टेंभू साठी राज्य शासनाचा हात आखडताच !
२०१५-२०१५ साठी फक्त १५२ कोटींचे नियोजन 

Wednesday, 8 April 2015

२०१५ -१६ च्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थ संकल्पात टेंभूला अल्प निधी

२०१५ -१६ च्या राज्याच्या अर्थ संकल्पात टेंभूला अल्प निधी 
अनेक ठिकाणी नियोजनाचा अभाव : घाटमाथ्याला या वर्षीहि पाणी नाही 
Daily Pudhari 09/04/2015.

Monday, 6 April 2015

Sunday, 5 April 2015

Tembhu Water @ 10/- Rs.April 2015

एकदा उचलून पाणी आणायची योजना स्वीकारल्या नंतर आता ती परवडत नाही, इतके पैसे कुठनं आणायचे ? रानात काय सोनं पिकतंय का ? असले प्रश्न विचारून काय उपयोग. . . . टेंभू च्या नावानं आता बोंबलू नका …. गप गुमान बिलं भरा नाहीतर हे पाणी पण मिळणार नाही ….Tembhu Water @ 10/- Rs.April 2015


Wednesday, 1 April 2015

नकाशात नसताना आता पाट काढणे सुरु आहे

टेंभू योजनेच्या नावावर काय सुरु आहे ? नकाशात नसताना आता पाट काढणे सुरु आहे