टेंभूचा येरळा जलसेतू खचण्याचा धोका
ता. १६/०६/२०१६
येरळेच्या पात्रातील काटेरी झाडे जेसीबीने उखडण्यात येत आहेत. त्यामुळे टेंभू योजनेच्या जलसेतूला खचण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. याबाबत टेंभूच्या वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे.
चितळी गावातून जाणार्या येरळा नदीच्या 500 मीटरच्या आडव्या पात्रावर टेंभू योजनेचा हा जलसेतू उभारलेला आहे. हा जलसेतू 15 वर्षांपूर्वी बांधलेला आहे. सध्या या जलसेतूच्या एकूणच भवितव्याशी वाळू माफिया मंडळींचा खेळ सुरू आहे. गेल्या सात- आठ वर्षांपासून येरळेच्या पात्रातील वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. अलिकडच्या काळात तर वाळू माफियांची मजल पार जलसेतूच्या खालच्या स्तंभांना इजा पोहोचवण्यापर्यंत गेली आहे. चितळी हद्दीत अजस्त्र जेसीबी आणि पोकलँडच्या सहाय्याने हा वाळू उपसा सुरू आहे. वास्तविक जलसेतूच्या 150 ते 200 फुटाच्या दोन्ही बाजूंकडील अंतरात काहीही करता येत नाही. या जागेवर शासनाची मालकी असते. मात्र सध्या येरळे नदीच्या परिसरातील मोठ-मोठाली काटेरी बाभळीची झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे. काही महाभागांनी पार जलसेतूच्या खालची झाडे जे वृक्ष म्हणण्याइतपत मोठे झाले आहेत ते जेसीबी सारख्या अजस्त्र यंत्रांच्या सहाय्याने मुळापासून उखडून टाकण्यात येत आहेत. परिणामी उद्या या वृक्ष उखडण्यामुळे तेथील वाळू उघडी होत आहे. या वाळूवर आता वाळू माफियांची नजर गेली आहे. परंतु या सगळ्यात पात्रातील जलसेतूच्या स्तंभांना खचण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. याबाबत चितळी आणि चिखलहोळ परिसरातील काही जागरूक लोकांनी आक्षेप घेतला तर त्यांनाच तुम्हाला काय करायचे आहे ? असे सुनावले जाते.
याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने जागेवर जावून माहिती घेतली असता दोन, तीन जेसीबी यंत्रांच्याव्दारे पात्रातील मोठ-मोठी झाडे उखडण्याचे काम सुरू असल्याचे दिसले. पश्चिमेच्या बाजूला कोळशाच्या भट्ट्या टाकल्या आहेत, त्या लोकांना पलिकडच्या काही शेतकर्यांनी झाडे तोडण्याचे कंत्राट दिल्याचे सांगण्यात आले. परंतु थेट जलसेतूच्या खालपर्यंत स्तंभाखालीच झाडे उखडण्याचे आणि वाळू उपसण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याबाबत आता टेंभूच्या वरिष्ठ अधिकार्यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.

No comments:
Post a Comment