आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची,टेंभू योजनेची प्रत्येक बातमी घडामोड,प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष आणि सडेतोड मते.एखाद्या पाणी योजनेवरचा महाराष्ट्रातील किंबहुना देशातील बहुधा एकमेव अभ्यासपूर्ण ब्लॉग!
लोकांना मूर्ख बनवणे सोपे
Friday, 8 January 2021
कृष्णा नदीच्या पाण्याचे फेर वाटप करा
सद्य:स्थितीत खानापूर, आटपाडी, तासगांव व जत तालूक्यातील वंचित गांवे यासाठी सिंचन सुविधा देण्याची मागणी तीव्र आहे. बिगर सिंचनाचे शिल्लक पाणी प्रामुख्याने वारणा उप खो-यात असून व कोयना धरणाचे खाली कृष्णा नदी संगमाचे खाली उपलब्ध होऊ शकते. या बिगर सिंचन पाण्याचे फेर नियोजन करुन ते म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून ५ टी. एम. सी. व टेंभू उपसा सिंचन योजनेतून ८ टी.एम.सी.वापरासाठी उपलब्ध करता येऊ शकेल. यासाठी खानापूर, आटपाडी व इतर वंचित भागासाठी ५ टी.एम.सी.पाणी उपलब्ध करता येऊ शकेल. तसेच माण व खटाव तालूक्यासाठी ३ टी.एम.सी. पाणी उपलब्ध होऊ शकेल. खानापूर तालूक्यामधील वंचित गांवासाठी टेंभूची सद्य:स्थितीतील टप्पा ३(ब) ची उपलब्ध पंपीग क्षमता वापरुन खानापूर तासगांव कालव्यावरील प्रस्तावित उपसा सिंचन योजनेसाठी पाणी उपलब्धततेचे नियोजन :टेंभू प्रकल्पांतर्गत खानापूर तालुक्याचे एकूण सिंचन क्षेत्र १८,१७५ इतके हेक्टर आहे. तालुक्याचे क्षेत्र प्रामुख्याने टप्पा ३ (ब) वरील खानापूर तासगांव कालव्यावर ११,२९८ हेक्टर आहे व टप्पा ४ व ५ वर ६८७२ हेक्टर आहे. मा.आमदार अनिलभाऊ बाबर यांनी खानापूर तालुक्यातील वंचित गावांना टेंभू प्रकल्पाचा लाभ मिळावा यासाठी मा.मुख्यमंत्री यांना निवेदन देवून त्यांनी यावर मा.मुख्यमंत्री यांनी प्रस्ताव सादर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. टप्पा ३ (ब) चे मुळ क्षेत्र १८९७५ इतके हेक्टर होते. त्यापेकी ७७७० हेक्टर क्षेत्र हे तासंगांव तालुक्यातील होते. तथापि त्यासाठी स्वतंत्र उपसा सिंचन योजना केल्यामुळे सर्वसाधारण ८००० हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी अतिरीक्त पंपीग क्षमता ३ व या ठिकाणी उपलब्ध आहे. या अतिरीक्त पंपीग क्षमतेचा वापर करुन मा.लोकप्रतिनीधी यांनी केलेली मागणी व त्या भागातील भीषण टंचाईची वस्तुस्थिती लक्षात घेवून खानापूर तासगांव कालव्यावर दोन टण्प्यात २ टी.एम.सी. पाणी वापरुन ८००० हेक्टर क्षेत्रासाठी व वंचीत गावांसाठी लाभ देता येवू शकतो
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment