आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची,टेंभू योजनेची प्रत्येक बातमी घडामोड,प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष आणि सडेतोड मते.एखाद्या पाणी योजनेवरचा महाराष्ट्रातील किंबहुना देशातील बहुधा एकमेव अभ्यासपूर्ण ब्लॉग!
लोकांना मूर्ख बनवणे सोपे
Sunday, 10 January 2021
Friday, 8 January 2021
कृष्णा नदीच्या पाण्याचे फेर वाटप करा
कृष्णा नदीच्या पाण्याचे फेर वाटप करा
सद्य:स्थितीत खानापूर, आटपाडी, तासगांव व जत तालूक्यातील वंचित गांवे यासाठी सिंचन सुविधा देण्याची मागणी तीव्र आहे. बिगर सिंचनाचे शिल्लक पाणी प्रामुख्याने वारणा उप खो-यात असून व कोयना धरणाचे खाली कृष्णा नदी संगमाचे खाली उपलब्ध होऊ शकते. या बिगर सिंचन पाण्याचे फेर नियोजन करुन ते म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून ५ टी. एम. सी. व टेंभू उपसा सिंचन योजनेतून ८ टी.एम.सी.वापरासाठी उपलब्ध करता येऊ शकेल. यासाठी खानापूर, आटपाडी व इतर वंचित भागासाठी ५ टी.एम.सी.पाणी उपलब्ध करता येऊ शकेल. तसेच माण व खटाव तालूक्यासाठी ३ टी.एम.सी. पाणी उपलब्ध होऊ शकेल. खानापूर तालूक्यामधील वंचित गांवासाठी टेंभूची सद्य:स्थितीतील टप्पा ३(ब) ची उपलब्ध पंपीग क्षमता वापरुन खानापूर तासगांव कालव्यावरील प्रस्तावित उपसा सिंचन योजनेसाठी पाणी उपलब्धततेचे नियोजन :टेंभू प्रकल्पांतर्गत खानापूर तालुक्याचे एकूण सिंचन क्षेत्र १८,१७५ इतके हेक्टर आहे. तालुक्याचे क्षेत्र प्रामुख्याने टप्पा ३ (ब) वरील खानापूर तासगांव कालव्यावर ११,२९८ हेक्टर आहे व टप्पा ४ व ५ वर ६८७२ हेक्टर आहे. मा.आमदार अनिलभाऊ बाबर यांनी खानापूर तालुक्यातील वंचित गावांना टेंभू प्रकल्पाचा लाभ मिळावा यासाठी मा.मुख्यमंत्री यांना निवेदन देवून त्यांनी यावर मा.मुख्यमंत्री यांनी प्रस्ताव सादर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. टप्पा ३ (ब) चे मुळ क्षेत्र १८९७५ इतके हेक्टर होते. त्यापेकी ७७७० हेक्टर क्षेत्र हे तासंगांव तालुक्यातील होते. तथापि त्यासाठी स्वतंत्र उपसा सिंचन योजना केल्यामुळे सर्वसाधारण ८००० हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी अतिरीक्त पंपीग क्षमता ३ व या ठिकाणी उपलब्ध आहे. या अतिरीक्त पंपीग क्षमतेचा वापर करुन मा.लोकप्रतिनीधी यांनी केलेली मागणी व त्या भागातील भीषण टंचाईची वस्तुस्थिती लक्षात घेवून खानापूर तासगांव कालव्यावर दोन टण्प्यात २ टी.एम.सी. पाणी वापरुन ८००० हेक्टर क्षेत्रासाठी व वंचीत गावांसाठी लाभ देता येवू शकतो
या योजनेसाठी K१ उपखोन्यात कृष्णा लवादानुसार विगरसिंचनासाठी ३३ टी.एम.सी. इतकी तरतूद असून सद्यस्थितीत पाणी वापर ९ टी.एम.सी. इतका होतो. भविष्यकाळात वाढणारी लोकसंख्या व उद्योग यांचा विचार करुन जास्तीतजास्त पाणी वापर २० टी.एम.सी. इतका होवू शकतो. K१ उपखोऱ्यातील तसेच त्यालगतच्या उपखोन्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही. K१ उपखोऱ्यात बिगरसिंचनाच्या एकूण तरतूदीपैकी १३ टी.एम.सी. पाणी हे सिंचनासाठी उपलब्ध करता येवू शकते. या पाण्यापेकी २ टी.एम.सी. पाणी टेंभू प्रकल्पातील टप्पा ३आणि वरील खानापूर तासगांव कालव्यावर उपसा सिंचन योजना करून खानापूर तालुक्यातील वंचित गावांना लाभ देण्यासाठी नियोजन करता येईल. कृष्णा खोऱ्यात लवादानुसार समुच्यय पाणी वापर हा ५९४ टी.एम.सी. असून लवादाच्या मोजमापाच्या सूत्रानुसार प्रत्यक्ष ६६२ टी.एम.सी. पाणी वापर होणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीतील नियोजनानुसार होवू शकणा-या प्रत्यक्ष पाणी वापराची आकडेवारी उपरोक्त नमूद केली आहे. त्यामुळे कृष्णा खोन्यातील लवादाने दिलेल्या मर्यादित, अंतर्गत पाणी वापर करुन कायद्याच्या चौकटीत पाणी वापराचे उल्लंघन न करता या योजनेस पाणी देता येवू शकते.
आटपाडी, इतर वंचित गांवांसाठी नियोजन -
टेंभू टप्पा ३(अ) चे पुढे आटपाडी डावा कालव्यावर २००० हे. साठी उपसा सिंचन योजना राबवून आटपाडी तालूक्यातील वंचित गांवाना पाणी देता येऊ शकेल.
पाणी वापर वाढविण्यासाठी उपाययोजना -राज्यातील एकूण ५ उपखो-यांपैकी पाणी वापर वाढवणेसाठी मूळात त्याठिकाणी ७५ टक्के विश्वासर्हतेने अतिरीक्त पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी K-२, K-५ व K-६ या उपखो-यात ७५ टक्के विश्वासर्हतेने पाणी वापर वाढविणेसाठी पाणी शिल्लक दिसून येत नाही. तसेच K-३ उपखो- यामध्ये लवादाच्या निर्णयानुसार पाणी वापर वाढवण्यावर बंधन घातले आहे. त्यामुळे K-१ उपखो-यात मूवलक पाणी उपलब्ध असून तेथील प्रकल्पांचा पाणीवापर वाढविता येतो. मात्र पाणी वापर वाढविण्यासाठी अतिरिक्त पाणी साठे निर्माण करण्यास भौगालिक, सामाजिक , आर्थिक मर्यादा असून हा पाणी वापर मुख्यत: मोठया उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून पावसाळा कालावधीत वाढविता येतो. म्हणजे सोप्या भाषेत असे कि , सातारा - कराड चा कोयना काठ, सांगलीचा कृष्णा काठ , कोल्हापूरकडचा पंचगंगा वगैरे नदी काठचा भाग या ठिकाणी आता नवीन मोठ्या धरणांच्या, किंवा तलावांच्या साईट्स शिल्लक राहिलेल्या नाहीत. शिवाय जरी अशा साईट्स नव्याने निर्माण केल्या तरी आता या नद्यांच्या काठालगतचे समृद्ध भागातले लोक इतर ठिकाणच्या स्थलांतरासाठी तयार होतील का ? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आता नव्याने भू संपादन आणि पुनर्वसन या कामांसाठी सरकारकडे तितका पैसा आहे का ? असे अनेक प्रश्न आहेत. आजवरचा अनुभव पाहता या प्रश्नावर तोडगा म्हणून पाणी वापर वाढवण्यासाठी जिहे काठापूर सह टेंभू, ताकारी , म्हैसाळ या उपसा पाणी योजनांचा पाणी उचलण्याचा कालावधी वाढवणे तो आपण पावसाळ्याच्या काळात वाढवू शकतो. आता K-१ उपखो-यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ, उरमोडी आणि जिहे काठापूर या उपसा सिंचन योजना पावसाळा कालावधीत पूर्ण क्षमतेने चालवून पाणी वापर वाढविणे शक्य आहे. या योजनांच्या सर्वसाधारण संकल्पनेनुसार योजना चालविण्या चा कालावधी तीन हजार ते साडेतीन हजार तास (पूर्ण क्षमतेने) इतका येतो. म्हणजेच दिवसांच्या हिशोबात सांगायचे झाले तर १३० ते १४० दिवस इतका येतो. हाच कालावधी २०० दिवस (म्हणजे पाच हजार तास) इतका वाढवल्यास आपल्या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील टेंभू , ताकारीसह पाच हि उपसा सिंचन योजनांव्दारे अतिरीक्त २५ टी.एम.सी. पाणी वापर होऊ शकतो. या योजनांचे काही ठिकाणी विस्तारीकरण करुन २५ टी.एम.सी. पाणी वापराचे नियोजन करतान अवर्षण प्रवण भागातील मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये पाणी साठवून पाणी वापर करता येणे शक्य आहे. अवर्षण प्रवण भागातील मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये सरासरी ३० ते ३५ टक्के इतका पाणीसाठा होतो. त्यात प्रामुख्याने खानापूर, आटपाडी, जत, तासगांव, कवठेमहंकाळ, खटाव माण व सांगोला या तालूक्यामधील मध्यम आणि ल.पा. प्रकल्पात सरासरी २५ ते ३० टक्के इतकाच पाणी साठा होतो. तर काही वर्षे हे प्रकल्प पूर्णपणे कोरडे असतात. यामुळे कृष्णा खो-यातील पहिल्या लवादाच्या निर्णयानुसार पाणी वापर करण्यासाठी या ५ मोठ्या उपसा सिंचन योजना योजनांच्याद्वारे अतिरिक्त २५ टीएमसी पाणी वापराचे प्रथमतः करणे आवश्यक आहे. एका अभ्यासानुसार सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाणी योजनांमध्ये टेंभू १०, म्हैसाळ ७, ताकारी २ आणि उरमोडी व जिहे काठापूर प्रत्येकी ३ असे मिळून २५ टीएमसी पाणी वापर वाढवता येऊ शकतो. यातून सध्याच्या नियोजनापेक्षा १ लाख हेक्टर अधिक भाग आपण कमी खर्चात आणि आहे ती वितरण व्यवस्था वापरून भिजवू शकतो.
|
Subscribe to:
Posts (Atom)