लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Friday 11 September 2015

एक आठवण : भाई संपतराव पवार

एक आठवण : भाई संपतराव पवार
१७ सप्टेंबर २०१४ ची 
टेंभू योजनेच्या आराखड्यातील चुका 
आणि दोषांबद्दल गेली पाच वर्षे सातत्याने दैनिक पुढारीतून लिहित आहे, आहे .
 त्या आराखड्यानुसार चौथ्या 
आणि पाचव्या टप्प्यांतून  
पाणी खानापूर घाटमाथ्यावरच्या 
गावांना कधी मिळणार नाही.
 हे सप्रमाण सांगत आहे. 
आता खानापूर तालुका टेंभू कृती 
समितीने यावर नवीन पर्याय काढला आहे,
 असाच पर्याय बरोब्बर एक वर्षा
 पूर्वी क्रांती स्मृतीवनाचे 
प्रणेते भाई संपतराव पवार यांनी 
काढण्याचा प्रयत्न केला होता. 
त्यांनी हि लोकाना बोलावून मिटींगा 
घेवून , निवृत्त अभियंत्यांना बरोबर 
घेवून अभ्यास केला होता. पण त्यांनी 
निम्म्यातूनच हा प्रयत्न सोडून दिला. त्याचा हा फोटो पण माझ्या रेकॉर्डला होता… 
तो सर्वांच्या माहितीसाठी 

No comments:

Post a Comment