लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Wednesday, 1 July 2015

यंदा पुन्हा टेंभू चे पाणी भाग्य नगर तलावात Dt. 29/06/2015.TEMBHU UPDATE -
 Dt. 29/06/2015.
यंदा पुन्हा टेंभू चे पाणी भाग्य नगर तलावात येवून दाखल झाले. 
माहुलीच्या  पंप गृहातून टप्पा क्रमांक ३ ब मधून खानापूर तासगाव कालव्याच्या किलोमीटर ११ च्या एस्केप मधून पाणी सांगोला जवळ कन्हेर नावाच्या ओघळीत सोडले आहे. तेच पाणी पुढे साळशिंगे च्या ओढ्यामार्गे भाग्य नगर तलावाकडे  आहे. मागच्या वेळी वेजेगाव जवळ दादोजी पाटलोजी विद्यालयाच्या मागच्या बाजूने याच कालव्यातून किलो मीटर ९ मध्ये , वेजेगाव ओढ्यामार्गे भाग्य नगर तलावात सोडले होते. 

No comments:

Post a Comment