लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Thursday, 7 May 2015

टेंभू च्या पाण्यासाठी सांगलीत सोमवारी मोर्चा Dt. 07/05/2105 (सौजन्य - दैनिक लोकमत )

टेंभू च्या पाण्यासाठी सांगलीत सोमवारी मोर्चा : पाणी संघर्ष चळवळीचा इशारा : जिल्हाधिकार्याना निवेदन 
Dt. 07/05/2105 (सौजन्य - दैनिक लोकमत )
टेंभू चे पाणी मिळावे यासाठी हे आणखी एक आंदोलन ; 
आधी क्रांतिवीर नागनाथअण्णा  नायकवडी आणि आता श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने आटपाडी तालुक्यातील दिघंची परिसरातील लोक टेंभू योजनेचे पाणी आम्हाला मिळाले पाहिजे म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत…. गेली १८ -२० वर्षे हेच सुरु आहे…. चळवळ , आंदोलन, मोर्चा आणि परत चळवळ …. मात्र काही एक फरक पडत नाही असे का होत आहे ??? टेंभू योजनेचे पाणी नक्की आज कुणाला मिळालेय ? भविष्यात आणखी कुणाला मिळणार आहे ? कुणाला मिळणार नाही ? तसेच किती गावांना कधीच मिळणार नाही ? अखेर काय आहे टेंभूचे वास्तव …. वाचा फक्त  " श्वेतपत्रिका टेंभूची " अर्थात " व्हाईट पेपर ऑफ टेंभू " 
जाणून घेण्यासाठी   http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/...इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment