लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Monday, 15 April 2013

आटपाडी, सांगोल्याच्या शेतकऱ्यांची टेंभूत धडक

टेंभू उपसा जलसिंचन योजनेची कामे सुरु झाली नाहीत तर 29 एप्रिल पासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या धरणे आंदोलन
जगदीश कुलकर्णी: ( सांगोला) : - टेंभू उपसा जलसिंचन योजनेची कामे 28 एप्रिल पर्यंत सुरु झाली नाहीत तर 29 एप्रिल 2013 पासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आटपाडी व सांगोला तालुक्यातील शेतकरी, कार्यकर्ते ठिय्या धरणे आंदोलन करतील असा इशारा आमदार गणपतराव देशमुख यांनी सरकारला दिला. सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांनी आमदार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली टेंभू येथे भेट देवून योजनेची सद्य वस्तूस्थिती जाणून घेतली. यावेळी जि.म.सह.बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, सूतगिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे, माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर उपस्थित होते. दि. 14 एप्रिल रोजी टेंभू (कराड) येथे शेकापक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना आमदार गणपतराव देशमुख म्हणाले की, आम्ही दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काळात मरणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. आम्हीही पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी संघर्षासाठी तयार आहोत. पाणी मिळाल्याशिवाय आता मागे हटणार नाही. राज्याच्या अर्थसंकल्पात टेंभू प्रकल्पासाठी 79 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सरकारने फक्त 6 कोटी रुपये दिले. मुख्यमंत्री ना. चव्हाण आटपाडी येथे जानेवारीमध्ये आले होते त्यावेळी 73 कोटी टेंभूसाठी दिल्याची घोषणा केली. घोषणा केल्यानंतर सुमारे सव्वा महिन्यानंतर सदरचा निधी टेंभू प्रकल्पाकडे वर्ग झाला परंतु अद्यापही कामे सुरु झालेली नाहीत. जलसंपदामंत्री ना. तटकरे व कृष्णा खोरे मंत्री ना. रामराजे निंबाळकर यांचेशी टेंभूची कामे सुरु करण्यासंबंधी बैठका झाल्या. परंतु कामे अजूनही ठप्पच आहेत. यापूर्वी टेंभूचा निधी अन्यत्र वळविला होता. सन 2013-2014 राज्याच्या अर्थसंकल्पात टेंभूसाठी 152 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी 118 कोटी सांगली जिल्ह्यासाठी, 25 कोटी सोलापूर जिल्ह्यासाठी आणि 9 कोटी रुपये सातारा जिल्हा टेंभू प्रकल्पावर खर्च करण्याचे नियोजन आहे. या निधीसाठी राज्यपालांनी मान्यता दिली आहे. आटपाडीत 40-50 कि.मी. परिसरात टँकर भरण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. टेंभूची कामे पूर्ण झाल्यास दुष्काळी भागास पिण्यासाठी पाणी मिळू शकते. जेथे शक्य आहे तेथे शेतीसाठी पाणीपुरवठा करावा. आम्ही कोणाचेही पाणी बंद करण्यासाठी आलो नाही. पाणी मिळावे यासाठी आमचा लढा आहे.यावेळी बोलताना डॉ. भारत पाटणकर म्हणाले, आटपाडीसाठी 73 कोटी रुपये मिळूनही अद्याप कामे सुरु झालेली नाहीत. पंपहाऊस, बोगद्यांची कामे त्वरेने आली पाहिजेत. टप्पा क्र. 1 व टप्पा क्र. 2 मध्ये 5-5 पंप वाढवण्याची गरज आहे. धरणग्रस्तांचे 10 जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरु आहे. दुष्काळी भागाच्या शेवटपर्यंत पाणी मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. याठिकाणी उपस्थित असणार्‍या टेंभू उपसाच्या संबंधित अधिकार्‍यांनी टेंभूची कामे लवकरच सुरु करु असे सांगितले. यावेळी पंचायत समिती सभापती ताई मिसाळ, उपसभापती पांडूरंग पांढरे, सूतगिरणीचे व्हा. चेअमरन सिध्देश्वर लोखंडे, महिला सूतगिरणीच्या अध्यक्षा विमलताई कुमठेकर, सुवर्णलता कारंडे, प्रभाकर चांदणे, मारुती लवटे, गजेंद्र कोळेकर, सुब्राव बंडगर, हणमंत बंडगर, बाळासाहेब एरंडे, गोविंद जाधव, नवनाथ पवार, जगदीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

                                                     (दैनिक पुढारी )
आटपाडी, सांगोल्याच्या शेतकऱ्यांची टेंभूत धडक  (दै. सकाळ )
कडेगाव - टेंभू योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करून पिढ्यान्‌पिढ्या होरपळणाऱ्यांना तातडीने पाणी द्या, अशी मागणी करत आमदार गणपतराव देशमुख (सांगोला) व श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली पाच हजारांवर दुष्काळग्रस्तांनी रणरणत्या उन्हात टेंभू (ता. कऱ्हाड) येथे टप्पा क्र.1 (अ) च्या पंपहाऊसवर धडक दिली. मुख्य अभियंता अविनाश सुर्वे यांनी दूरध्वनीवरून, तर कार्यकारी अभियंता महेश सुर्वे यांनी अधिकाऱ्यांमार्फत दहा दिवसांत अपूर्ण कामे सुरू करतो, असे लेखी आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, दहा दिवसांत कामे सुरू न झाल्यास सांगली पाटबंधारे कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा श्रमिक मुक्ती दलाने दिला आहे .

याप्रसंगी बोलताना आमदार देशमुख म्हणाले,""कडेगावचे पाणी बंद करा आणि दुष्काळी भागाला पाणी द्या, अशी आमची मागणी नाही. तसा कोणी तरी गैरसमज करून दिला आहे. तो चुकीचा आहे. आम्ही पाणी बंद करायला नाही, तर पाणी द्या, अशी मागणी करायला आलो आहे. तुमचे पाणी बंद केले तर ते आटपाडी आणि सांगोल्याला कसे मिळणार? दुष्काळग्रस्तांना पाणी मिळू नये, दुष्काळग्रस्त भांडत बसावेत, असाही काहींचा प्रयत्न आहे. अशा लोकांकडे दुर्लक्ष करून पाण्यासाठी एकत्र लढा देणे गरजेचे आहे.''

ते म्हणाले,""तीन वर्षांपूर्वी टेंभूला 135 कोटी रुपये मंजूर झाले. शासनाने मंजूर पैसे दुसरीकडे वळवले. योजनेची कामे रखडली. अनेक वर्षांपासून लोक पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आटपाडीतील लोकांनी 36 दिवस आंदोलन केले. शासनाने योजनेला 73 कोटी रुपये मंजूर केले, तरीही एक-दोन कामांचा अपवाद वगळला तर बहुतांश कामे सुरू केलेली नाहीत. पैसे शासनाने दुसरीकडे वळवू नये, यासाठी आंदोलन केले आहे. श्रेय कोणालाही मिळो, आमची अपेक्षा शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे, ही आहे. कडेगावपासून ते सांगोल्यापर्यंतच्या लोकांना पाणी मिळेपर्यंत आंदोलन करीत राहू.''

श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर म्हणाले,""अनेक वर्षांपासून दुष्काळी भागाला पाणी मिळाले पाहिजे, म्हणून चळवळ व आंदोलने करीत आहे. मी पाणी बंद करणारा कार्यकर्ता नाही, तर लोकांना पाणी मिळाले पाहिजे या विचाराचा कार्यकर्ता आहे. आंदोलन केल्याने टेंभूला 73 कोटींचा निधी मिळाला. यातून अपूर्ण कामे पूर्ण करून आटपाडीला पाणी द्या, अशी मागणी आहे. पाणी देताना कडेगावचे बंद करा असा हेतू नाही. कडेगाव, खानापूर व आटपाडीला पाणी देण्यासाठी टेंभू व माहुली पंपगृहाचे पाच-पाच पंप सुरू करावेत, अशी मागणी आहे. टेंभूच्या लाभ क्षेत्रातील प्रत्येक गावाला पाणी मिळाले पाहिजे. त्यासाठी लढा आहे. खानापूर, आटपाडी व सांगोला येथे दुष्काळ आहे. येथील लोकांना पाणी मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा देऊन योजना पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.''

टेंभूचे उपअभियंता एस. पी. शेणवी, आनंदराव पाटील, दिलीप पाटील, अण्णासाहेब पत्की, हणमंतराव देशमुख, रामभाऊ पाटील, चंद्रकांत देशमुख (सांगोला), मोहनराव यादव, जयदीप देशमुख, दत्तूशेठ सूर्यवंशी, संतोष गोटल, युवराज यादव, बिभीषण यादव, दाजी देशमुख, हणमंत पवार, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश यादव, धनंजय देशमुख, आनंदा चव्हाण, शाहीर यादव, दीपक शेडगे, रामचंद्र घार्गे, शिवाजी चन्ने आदी व महिलांसह खानापूर, आटपाडी व सांगोला तालुक्‍यांतील आंदोलक उपस्थित होते.

ठळक घडामोडी...
*आज झालेले आंदोलन अधिकऱ्यांनी बेदखल केले. एका उपअभियंत्याचा अपवाद वगळता कोणीही प्रमुख अधिकारी आंदोलनस्थळी आला नव्हता.
*श्रमिक मुक्ती दलाने पंप बंद करण्याचा इशारा दिला. राष्ट्रवादीने आव्हान दिल्याने पंप अखंडितपणे सुरू. ठिय्या आंदोलनही बारगळले.
*भाषणासाठी माईक घेण्यावरून राष्ट्रवादी व श्रमिक मुक्ती दल कार्यकर्त्यांत हमरीतुमरी

Shramik mukti Dal chief Mr. Bharat Patankar Wrote on Facebook = Work of Tembhu irrigation canal system has not started as yet despite the fact that 73 crores rupees are given by the government for taking water to Atpadi and Sangola tehsils. A roaring agitation was planned and successful, going to the beginning of the Tembhu scheme from where the water is going to be lifted from Krishna river. Sangola and Atpadi are worst hit by drought in Maharashtra. Authorities had agreed to start the work in 10 days. Shame on Rashtrawadi and Congress goons from Kadegaon taluka who opposed this agitation.

No comments:

Post a Comment