आता तासगावचा संबंधच नाही ; मग कालव्याचे नाव खानापूर - तासगाव कां ?
खानापूर - तासगाव कालवा … टेंभू योजनेच्या सुरुवातीच्या आराखड्यात हा कालवा १०६ किलो मीटर अंतराचा होता. परंतू मध्येच गेल्या दोन वर्षा पूर्वी तासगाव तालुक्यातील टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रातील गावांना पाणी देण्यासाठी राज्य सरकारने विसापूर - पुणदी उपसा सिंचन योजना निर्माण केली. टेंभू योजनेच्या टप्पा क्रमांक २ नंतर खंबाळे बोगद्यातून पाणी सुर्ली घाटावर आल्यानंतर आरफळ कालव्यात टेंभू योजनेचे पाणी उताराने सोडून बंदिस्त पाईप लाईन द्व्यारे पेड तलावापर्यंत आणण्याचे नियोजन विसापूर - पुणदी उपसा सिंचन या योजनेत आहे. परंतू माहुली नंतर टप्पा क्रमांक ३ मध्ये जो खानापूर -तासगाव कालवा होता तो ४२ किलोमीटर अंतरापर्यंतच मर्यादित करण्यात आला. त्या मुले आता तासगावचा आणि या कालव्याचा अर्थअर्थी संबंध उरलेला नाही…. या कालव्याचे सध्या काय सुरु आहे ? ते प्रत्यक्ष वाचा….
No comments:
Post a Comment