लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Friday, 29 March 2013

उपसा जलसिंचन प्रकल्पांचे काय होणार ?

अनेक वर्षांपासून  उपसा जलसिंचन प्रकल्पांचे घोंगडे भिजत पडलेले आहे. मेरी चे विजय पांढरे यांनी हे सर्वच उपसा सिंचनाचे प्रकल्प हे उपयोगाचे ठरणार नाहीत, ते अव्यवहार्य आणि अतार्किक आहेत असे मत जाहीरपणे मांडून अंतिमतः ते त्वरित बंद केले पाहिजेत असे सुचवले आहे. या उपसा सिंचन प्रकल्पांबाबत आता अनेक टीका,  मत-मतांतरे व्यक्त केली जात आहेत. ज्या लोकांसाठी ज्या भागांच्यासाठी हे प्रकल्प आखलेत ते लोक, तो भाग आजही दुष्काळी आहे., कोरडेच आहेत.  शेवटी  काय होणार या प्रकल्पांचे ?  पूर्ण होतील का ? झालेच तर कधी होणार ? अखेर काय घडेल
?...या सगळ्या प्रश्नांची रोखठोक उत्तरे, आणि राजकारणा पलीकडे जावून केलेला अभ्यास आणि माझी परखड मते ......
श्वेतपत्रिका टेंभूची.....आजपासून दररोज वाचा http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/ 

New Proposal Of Tembhu L.I.S.

टेंभू जलउपसा सिंचन  योजनेचे पाणी आटपाडीला मिळण्यासाठी तब्बल अजून एका वर्षाचा कालावधी आणि २०० कोटी रुपयांची गरज आहे. हे पाणी लवकरात लवकर आणि कमी पैश्यात आटपाडीत नेण्याच्या दृष्टीने विटा विभागीय पत्रकार संघाने एक योजना राज्य शासना समोर मांडली आहे.  माहुली पंपगृहाच्या अलीकडे १ किलो मीटर अंतरावर २७ कि. मी.  चा बोगदा काढून टेंभू चे पाणी उताराने केवळ १६. ५० कोटी रुपयांमध्ये आटपाडीत पोहोचू शकेल असा  हा प्रस्ताव आहे. तोच हा
प्रस्ताव…

Monday, 18 March 2013

केवळ ६ कोटीत पाणी उताराने आटपाडीत पोहोचू शकेल-माजी सरपंच परशुराम गायकवाड

टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी बलवडी (खानापूर) च्या पठारावरून उतरणे आटपाडीत जाऊ शकेल असा दावा माजी सरपंच परशुराम गायकवाड यांनी केला आहे. त्यासाठी टेंभू योजनेचा टप्पा क्रमांक ३ ब आणि ४ वेजेगाव आणि टप्पा क्रमांक ५ भूड पंपग्रहाचे काम जर महाराष्ट्र शासनाचे अधिकारी १७ कोटीत पूर्ण होणार असेल तर केवळ ६ कोटीत पाणी उताराने आटपाडीत पोहोचू शकेल.

Saturday, 2 March 2013

Maharastra D.C.M. Mr., Ajit Pawar Orders his Officers To Check Visbility Of This Project.

*********ह्या गोष्टी आवश्यक आहेत तरच****

टेंभू चे पाणी उताराने आटपाडीत येवू शकते…….

या पर्यायाकडे राज्य शासनाने गंभीरपणे पाहायला पाहिजे, एकदा आखलेली योजना जर चुकीच्या निष्कर्षावर आधारित असेल आणि त्यातून लोकांचा फायदा होणार नसेल तर केवळ कुणाच्या तरी हट्टासाठी टेंभू योजनेचे वाटोळे होऊ नये असे वाटते. टेंभू चे पाणी उताराने आटपाडीत येवू शकते हि काही कवी कल्पना नाही. खरेच जर टोपोशिट्स, गूगल अर्थचा... वापर करून आणि प्रत्यक्ष साईट सीइंग करून हे लक्षात येत असेल तर सगळ्या लोकांनी शासनाकडे (तहसीलदार,प्रांत, जिल्हाधिकारी वगैरे) तशी लेखी निवेदन देवून मागणी केली पाहिजे. आवश्यकता असेल तर शासनाने त्यांच्या अधिकार्यांकडून पुन्हा सर्वे करायला लावावे. परंतु जे अधिकारी सर्वे करतील ते तठ्स्त असावेत. कोणाच्याही राजकीय दबावाला, अथवा अमिषाला ते बळी पडणारे नसावेत. आणि मुख्य म्हणजे जेंव्हा शासनालाही हे पटेल कि कमी खर्चात आणि कमी वेळेत टेंभू चे पाणी आटपाडीत उताराने देता येवू शकते. तेंव्हा ज्या निविदा अधिकारी काढतील त्या डी. एस. आर. प्रमाणे असव्यात. तसेच त्यात लोकसहभाग हा मुद्दा अवश्य घालावा.

Tuesday, 26 February 2013

What About Tembhu Lift Irrigation ? Where 73 crores gone?

अखेर काय चाललेय टेंभू च्या नावावर ?.

टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्प , १९९६ मध्ये सुरु झालेला हा प्रकल्प आज १६ वर्ष रखडला आहे. ७०० कोटींचा हा प्रकल्प आज ४ हजार कोटींच्यावर पोहोचलाय. आतापर्यंत १४८९ कोटी रुपये खर्च झालेत आणि केवळ २७५ एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.  आतापर्यंत तीन विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका या योजनेच्या नावाखाली लढवल्या आणि जिंकल्या गेल्यात.  या भागात आलेला प्रत्येक बडा नेता किंवा मंत्री टेंभू चे नाव घेतल्याशिवाय आपले भाषण पूर्ण करत नाही. सत्ताधारी, विरोधक, डावे- उजवे सगळेच पक्ष टेंभू च्या नावावर मते मागतात, परंतू  ज्या आटपाडी, खानापूर, जत या दुष्काळी तालुक्यांसाठी हा तयार करण्यात आला. ते तालुके अद्यापही कोरडेच आहेत. शेवटी  काय होणार या प्रकल्पाचे ? हा पूर्ण होणार का ? झालाच तर कधी होणार ? अखेर काय चाललेय टेंभू च्या नावावर ?...या सगळ्या प्रश्नांची रोखठोक उत्तरे, आणि राजकारणा पलीकडे जावून केलेला अभ्यास आणि माझी परखड मते ......
श्वेतपत्रिका टेंभूची.....आजपासून दररोज वाचा http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/