टेंभू जलउपसा सिंचन योजनेचे पाणी आटपाडीला मिळण्यासाठी तब्बल अजून एका वर्षाचा कालावधी आणि २०० कोटी रुपयांची गरज आहे. हे पाणी लवकरात लवकर आणि कमी पैश्यात आटपाडीत नेण्याच्या दृष्टीने विटा विभागीय पत्रकार संघाने एक योजना राज्य शासना समोर मांडली आहे. माहुली पंपगृहाच्या अलीकडे १ किलो मीटर अंतरावर २७ कि. मी. चा बोगदा काढून टेंभू चे पाणी उताराने केवळ १६. ५० कोटी रुपयांमध्ये आटपाडीत पोहोचू शकेल असा हा प्रस्ताव आहे. तोच हा
आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची,टेंभू योजनेची प्रत्येक बातमी घडामोड,प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष आणि सडेतोड मते.एखाद्या पाणी योजनेवरचा महाराष्ट्रातील किंबहुना देशातील बहुधा एकमेव अभ्यासपूर्ण ब्लॉग!
लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…
No comments:
Post a Comment