टेंभू योजनेच्या सध्याच्या आराखड्यात सातारा , सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १०० हून अधिक गावे नाहीतच… या वंचित गावांचा समावेश या योजनेत समाविष्ट झाल्याशिवाय या भागातला दुष्काळ पूर्णपणे हटणार नाही. कारण या दुष्काळी पट्ट्यात आता नवीन दुसरी कोणतीही योजना राबवणार नाही असे धोरण महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहे. मग काय होणार या वंचित गावांचे ???
आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची,टेंभू योजनेची प्रत्येक बातमी घडामोड,प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष आणि सडेतोड मते.एखाद्या पाणी योजनेवरचा महाराष्ट्रातील किंबहुना देशातील बहुधा एकमेव अभ्यासपूर्ण ब्लॉग!
लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…