1993 पासून आतापर्यंत अंतहीन सुरु असलेले आंदोलन, एक चळवळ आपण पहिली आणि पाहत आहोत , आता उद्याच्या रविवारपासून (तारीख- १ डिसेंबर 2013 ) आणखी एक मोठा लढा , मोठी चळवळ उभी राहत आहे. ज्यात परत एकदा 12-13 दुष्काळी तालुके एकत्र करण्यात येणार आहेत. हे काही आपल्याला नवीन नाही. पाण्यासाठी आपण काहीही करायला तयार आहोत. पण या चळवळीला तरी अंत असावा, हे आंदोलन तरी अखेरचे ठरावे, एव्हढीच अपेक्षा…. विजय लाळे / विटा.
आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची,टेंभू योजनेची प्रत्येक बातमी घडामोड,प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष आणि सडेतोड मते.एखाद्या पाणी योजनेवरचा महाराष्ट्रातील किंबहुना देशातील बहुधा एकमेव अभ्यासपूर्ण ब्लॉग!
लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment