लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Friday, 8 November 2013

टेंभूचे पाणी नाही नवीन योजनाही नाही :

टेंभूचे पाणी नाही नवीन  योजनाही नाही :
खानापूर - आटपाडी तालुक्यांवर अन्यायाची परंपरा सुरूच
खानापूर आणि आटपाडी हे तालुके दुष्काळी राहिले तरच उरलेल्या सांगली जिल्ह्यात टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत निधी मिळेल, जर हे दोन्ही तालुके दुष्काळ मुक्त झाले किंवा या तालुक्यांना पाणी मिळाले तर जिल्ह्याला टंचाई निधी मिळणार नाही. त्यामुळे दुष्काळाच्या नावाखाली या दोन तालुक्यांना चार छावणी, डेपो आणि तैंकर द्यायचे आणि म्हैसाळ, ताकारी आणि  टेंभूच्या लाभ दारी भागातल्या उपसा सिंचन योजनांची बिले या टंचाई निधीतून भरायची असा सर्रास उद्योग जिल्ह्याच्या राजकारणात सुरु आहे, नाहीतर टेंभू चे पाणी खानापूर आटपाडीला लवकर न देण्या मागे दुसरे कारण तरी कोणते आहे ?


Saturday, 2 November 2013

ढालगावसह आठ गावे 'टेंभू'त समाविष्ट

ढालगाव : ढालगावसह परिसरातील आठ गावांचा समावेश टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात झाला आहे. याबाबतचे पत्र कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालकांना प्राप्त झाले. त्याची प्रत आज माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत हाक्के यांना मिळाली. त्यानंतर येथील कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली.
ढालगाव, शिंदेवाडी, कदमवाडी, ढोलेवाडी, चोरोची, जांभूळवाडी, चुडेखिंडी, दुधेभावी या आठ गावांचा टेंभू प्रकल्पांतर्गत व कवठेमहांकाळ कालव्याच्या लाभक्षेत्रात समावेश करण्याबाबत शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. तशा आशयाचे पत्र नुकतेच कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना प्राप्त झाले आहे. त्याची प्रत आज चंद्रकांत हाक्के यांनी कार्यकर्त्यांना दाखवताच कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली व आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी जि. प. सदस्य चंद्रकांत हाक्के, कुमार पाटील, बापूसाहेब खुटाळे, उपसरपंच अरविंद स्वामी, संजय पाटील, दौलत पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
ढालगावसह परिसरातील गावांना व घाटमाथ्यालाही पाणी मिळावे यासाठी सर्वपक्षीय आंदोलन केल्यानंतरच गृहमंत्री आर. आर. पाटील या भागाला पाणी देण्याचे अभिवचन दिले होते. ते पूर्ण झाल्याची भावना यावेळी हाक्के यांच्यासह कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. (वार्ताहर)ढालगावसह आठ गावे 'टेंभू'त समाविष्ट

Tuesday, 8 October 2013

कृष्णेचे पाणी माणगंगे मार्गे भीमा खोऱ्याला देण्यात यावे


 महाराष्ट्रात सध्य स्थितीत प्रकल्प निहाय पाणी वाटपाची बाब अडचणीची ठरत असल्याने राज्याने शोधलाय नवा पर्याय … …कृष्णा खोऱ्यातील  आपल्या वाट्याचे पाणी वाचवण्यासाठी राज्य सरकार ते दुष्काळ  प्रवण भीमा खोऱ्यात नेण्याची तयारी कृष्णा पाणी लवादासमोर दर्शविली आहे … 
माणगंगा नदी ही भीमा नदीच्या खोऱ्यातीलच नदी आहे …. मग कृष्णेचे पाणी  माणगंगे मार्गे भीमा खोऱ्याला देण्यात यावे … बारमाही माणगंगा पथकाची राज्य सरकारकडे मागणी।

Friday, 4 October 2013

टेंभू च्या पाईप लाईन निविदा चर्चेविनाच मंजूर

 मित्रांनो, जरा वाचा …  टेंभू च्या पाईप लाईन निविदा चर्चेविनाच मंजूर
आपल्या टेंभू योजनेबद्दल काय लिहिलंय दैनिक लोकसत्ता, पुणे च्या ३ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात ।

Wednesday, 25 September 2013

टेंभू योजनेच्या कालव्यालाच लावलाय स्टोन क्रशर

टेंभू च्या नावाखाली काय काय चालले आहे ते प्रत्यक्ष पहा.
टेंभू उपसा जल सिंचन योजने मुळे कुणा कुणाला काय काय लाभ होतोय….
टेंभू योजनेच्या कालव्यालाच लावलाय स्टोन क्रशर …. 
खानापूर तालुक्यात शासनाच्या डोळ्यात धूळफेक ;  महसुलास  चुना
टेंभू योजनेचे स्वप्न विकून निवडणुका लढवणारया आणि जिंकणाऱ्यानो आणि तमाम दुष्काळग्रस्तांनो पहा…. 
काय चाललेय खानापूर , आटपाडी या दुष्काळी तालुक्यातील जनतेला पाणी द्यायच्या नावाखाली… ?
जाणून घ्या एका क्लिक वर…. राजकारणा पलीकडे जावून केलेला अभ्यास आणि माझी परखड मते ......

श्वेतपत्रिका टेंभूची.....आजपासून दररोज वाचा http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/ या ब्लॉग वर आणि जरूर प्रतिक्रिया द्या. (ताजा कलम - कृपया या ब्लॉगच्या सगळ्या जुन्या आणि नव्या पोस्ट्स पहाव्यात )

Sunday, 22 September 2013

टेंभू योजना आणि वाळू काय आहे वास्तव

टेंभू योजना आणि वाळू उपलब्धी याबाबत संभ्रम निर्माण केले जात आहेत , काय आहे वास्तव ?