https://sites.google.com/view/vijaybhaskarlale/about-vijay-bhaskar-lale
आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची,टेंभू योजनेची प्रत्येक बातमी घडामोड,प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष आणि सडेतोड मते.एखाद्या पाणी योजनेवरचा महाराष्ट्रातील किंबहुना देशातील बहुधा एकमेव अभ्यासपूर्ण ब्लॉग!
लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…
Sunday, 23 August 2026
Tuesday, 8 April 2025
आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून गौरवद्गार
जत तालुक्यातील पत्रकार संघाच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी टेंभू योजने संदर्भात विजय लाळे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले
Friday, 3 May 2024
गंगा कालव्याची कहाणी - उत्तर प्रदेश
गंगा कालव्याची कहाणी - उत्तर प्रदेश
https://www.loksatta.com/sampadkiya/columns/story-of-ganga-canal-construction-by-sir-proby-cautley-zws-70-4353825/
Monday, 2 August 2021
कृष्णेच्या महापूरावर कृष्णा -माणगंगा नदी जोड प्रकल्प जालीम उपाय ठरेल !
कृष्णेच्या महापूरावर कृष्णा -माणगंगा नदी जोड प्रकल्प जालीम उपाय ठरेल !
विटा : विजय लाळे
सातारा,सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या कृष्णा नदीच्या पाणलोटातील महापूरावर कृष्णा -माणगंगा नदी जोड प्रकल्प जालीम उपाय ठरु शकतो.
महाबळेश्वरच्या डोंगर रांगांत दरवर्षी सरासरी ६ हजार ५०० मि.मी. पाऊस पडतो. त्यामुळे अनेक वेळा कृष्णेला महापूर येतो. त्या पुराचा फटका सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील कृष्णाकाठच्या अनेक गावांना बसतो. मात्र त्याच वेळी माणगंगा, येरळा आणि अग्रणी नद्यांच्या खो-यात दुष्काळी परिस्थिती असते. केवळ पावसाळ्याच्या काळातील, म्हणजे ३० जून ते १५ सप्टेंबरपर्यंतचे पाणी जरी दरवर्षी मिळाले तरी तो भाग सुफलाम होईल. कृष्णा लवादाच्या वाटपाव्यतिरिक्त पावसाळ्यातील ४.५२ टी.एम.सी. पाणी कृष्णा नदीत उपलब्ध आहे. त्या शिवाय कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोळशी नदीवर धनगरवाडी गावाजवळ वळण बंधारा बांधून ते पाणी धोम धरणात आणि तेथून उताराने थेट दुष्काळी भागाकडे आणण्यात येणार आहे. याबाबत बारमाही माणगंगा अभ्यास पथकाने २००६ ते २००८ या कालावधीत अनेक गुगल मॅप्स, सॅटॅलाइट इमेज री आणि टोपोशिट्स तसेच प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन सर्वेक्षण करून नोंदी घेऊन एक प्रकल्प आराखडा तयार केला.या अभ्यास पथकामध्ये मध्ये पाटबंधारे ची निवृत्त अभियंता डी.डी.पवार,कै.पी.ए.पाटील, आटपाडीच्या माणगंगा साखर कारखान्याचे तत्कालीन कार्य कारी संचालक एच.एस.पाटील, सांगोला (सोलापूर) येथील प्राध्यापक अमोल पवार आणि पत्रकार विजय लाळे यांचा सहभाग आहे.त्यानंतर या पथकाने सविस्तर प्रस्ताव तयार करून सांगली आणि सातारा जलसंपदा विभागाकडे दिला. त्यावर राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या सातारा आणि सांगली या दोन्ही विभागांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुन्हा शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत सर्वेक्षण केले आणि या प्रकल्पाच्या आराखड्यावर शिक्कामोर्तब केले.
*असा हा प्रकल्प आराखडा*
कोयना धरणाच्या पाणलोटातील सोळशी नदी वर धनगरवाडी गावाजवळ एक वळण बंधारा बांधून ८.७६ किलोमीटर लांबीचा पहिला बोगदा प्रस्तावित आहे. या बोगद्यातून धोम धरणाकडे (कृष्णा नदीवरच्या या धरणाची साठवण क्षमता १४ टी.एम.सी.आहे) चौर्याण्णव घनमीटर प्रती सेकंद विसर्गाने ३.५० टी.एम.सी. पाणी येईल. या धरणाची पूर्ण संचय पातळी ७४७.७० मीटर आहे. यातून १९७९-१९८० ते २००७-०८, २००९-१० आणि २००१५ ते २०२१ पर्यंतच्या कालावधीत प्रत्यक्ष सांडव्यातून पाण्याचा विसर्ग लक्षात घेता सरासरी ४.५२ टी.एम. सी. पाणी योजना बाहेरचे उपलब्ध आहे. असे दोन्ही मिळून या प्रकल्पासाठी एकूण ८.०२ टी.एम.सी. पाणी उपलब्ध आहे.
सोळशी ते धोम धरणाच्या डाव्या काठापासून (उत्तरेकडून) ते दबई नाला (तालुका आटपाडी, जिल्हा सांगली) या दरम्यान ११७ किलोमीटर लांबीचा दुसरा मुख्य बोगदा काढण्यात येणार आहे. त्या बोगद्याला धोमपासून ७६ कि.मी.वर दरुज-वाकेश्वरजवळ पूर्वोत्तर दिशेला १५ कि.मी.वर असणा-या पिंगळी नदीला जोडणारा आणखी एक उपबोगदा काढण्यात येणार आहे. ही पिंगळी नदी गोंदावले बुद्रुकजवळ माणगंगे ला मिळते. ते अंतर साधारणत: ४.५० कि.मी. इतके आहे. त्यामुळे गोंदावले बुद्रुकपासून माणगंगेवरील सर्व मध्यम, लघू पाटबंधारे, तलाव आणि कोल्हापूर पध्दतीच्या बंधारे यांना पाणी मिळेल.तसेच दुसऱ्या बाजूला धोमकडून येणाऱ्या या मुख्य बोगद्यातून दबई नाल्यात येईल आणि या जवळच्या जांभुळणी नाल्यातून पुढे ४ किलोमीटरवर घाणंद संतुलन तलावात येईल. तेथून पुढे टेंभू योजनेच्या अस्तित्वात असलेल्या सर्व वितरण प्रणालीचा (म्हणजेच कालव्यांचा) वापर करून पाणी सर्वत्र देता येईल. दुसरीकडे जांभुळणी तलावातून बाहेर पडलेले पाणी थेट आटपाडी तलावात जाईल. हा तलाव भरल्यानंतर पुढे शुक ओढ्यामार्गे आटपाडी शहराच्या पूर्वेस माणगंगा नदीला जाईल. तर पिंगळी नदीतून राजेवाडी तलावामार्गे आटपाडी तालुक्याच्या उत्तर भागातून फिरून एकत्रितपणे आलेले पाणी माणगंगेतून सोलापूर जिल्ह्याकडे जाईल.
दरम्यान,घाणंद तलावापासून निघालेला टेंभूचा कालवा (सांगोला शाखा) नेलकरंजी, मानेवाडी, हिवतड या मार्गे सांगोल्याकडे जात असताना चिंचाळे, खरसुंडी, कानकात्रेवाडी, माळेवस्ती, तळेवाडी या गावांतील ओढ्यातून त्या खालच्या करगणी, पात्रेवाडी, बनपुरी, कचरेवस्ती, शेटफळे आदी गावांना आणि परिसरातील सर्व लहानमोठ्या तलावांना पाणी मिळेल आणि ते सर्व पाणी टेंभू योजनेच्या या शाखेला कवठेमहांकाळकडे जाणा-या बाणुरगड बोगद्यातून उताराने जाऊन सर्व ओढे, नाले व त्यावरील बंधारे, तलाव आपोआप भरतील. तसेच, ज्या ज्या ठिकाणी पाणी साठवण योजना आहेत त्या पूर्ण क्षमतेने भरून उर्वरित पाणी खालच्या बाजूस माणगंगा नदीला मिळणार आहे.
येरळा ही कृष्णेची उपनदी असली तरी मुळात माणदेशातील आहे. या नदीच्या एकूण १०० कि.मी. लांबीपैकी या प्रकल्पातून वडूज ते ब्रम्हनाळ अशा ६८ कि.मी.च्या पात्राला थेट पाणी देता येईल. धोम मधूनच्या ११७ कि.मी. लांबीच्या मुख्य बोगद्याला ८५ कि.मी.वर फक्त १०० मीटर लांबीचा आणखी एक पोटबोगदा काढून वडूजजवळ लेंडूर ओढ्याजवळ पाणी येरळवाडी तलावात सोडले तर ते पुढे येरळेला जाते. त्यामुळे या नदीलाही मिळेल.या बरोबरच
अग्रणी या कृष्णेच्या आणखी एका उपनदीला ही प्रकल्पाव्दारे प्रवाहित करता येते. अग्रणी नदीची लांबी ७५ कि.मी.इतकी आहे.ही नदी भूड (ता. खानापूर, जि.सांगली ) गावाजवळील भिवघाटापासून उत्तरेला डोंगरात उगम पावते. धोममधून आणलेले पाणी जांभुळणी तलावातून टेंभू योजनेच्या, सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व कालव्यांव्दारे पुढे नेलकरंजी (ता.आटपाडी) फाट्यापासून ५ कि.मी.चा बोगदा काढून वायफळेच्या अलिकडे यमगर वाडी रस्त्याजवळ (ता. तासगाव) अग्रणीला पाणी देता येईल. या ठिकाणी पाणी ४ मीटरच्या नैसर्गिक उताराने नेलकरंजीहून बोगद्याद्वारे अग्रणीला मिळेल. ही नदी तासगाव, कवठे महांकाळच्या पुढे कर्नाटकातील खिळेवाडी (जि. बेळगाव) च्या पलीकडे जाऊन कृष्णेला मिळते. अशा रीतीने माणगंगा, येरळा आणि अग्रणी या तिन्ही नद्यांना पाणी मिळणार आहे.
* प्रकल्पाची वैशिष्ट्ये-
* माणगंगा,पिंगळी, येरळा आणि अग्रणी अशा चार नद्या जोडण्यात येणार.
* भारतातील नंबर दोनच्या व महाराष्ट्रातील क्रमांक एकच्या अति-अति तुटीच्या भागाला हक्काचे पाणी मिळणार
* पाणी लिफ्ट करण्या ऐवजी नैसर्गिक उताराने येणार असल्यामुळे विजेचा प्रश्न नाही.
* बोगद्याच्या १०० फूट उतारामुळे किमान ७ ते ८ मेगावॅट वीज निर्मिती शक्य.
* सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील कायमस्वरूपी दहा दुष्काळी तालुक्यांतील शेकडो गावांचा आणि खेड्यापाड्यांचा पाणीप्रश्न कायमचा सुटून टँकर्स, चारा छावण्यांसाठी होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचणार आहे. दुसरीकडे वाई शहरापासून पुढे सर्व कृष्णाकाठच्या गावांना महापूराचा धोका उरणार नाही.
* प्रकल्पासाठी फक्त बोगद्या किंवा आवश्यक तिथे कालव्यांसाठी लागणारी जमीन शासनाला संपादित करावी लागणार. यातील बहुतांश जमीन शासकीय आहे. त्यामुळे गाव उठवणे किंवा पुर्नवसन करणे हे प्रश्न निर्माण होणार नाहीत.
*माणगंगा, येरळा आणि अग्रणी या तिन्ही नद्यांच्या काठावरील एकूण साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल.
* या भागातील झाडे-झुडपे वाढून वातावरणातील आर्द्रता वाढून भविष्यातील तापमानवाढीचा धोका टळेल.
* दरवर्षी पाणी वाहिल्यामुळे तिन्ही नदीकाठ च्या विहिरी जिवंत होतील, तसेच नैसर्गिक रीत्या भूगर्भपातळी वाढेल.
*माणगंगा नदी सरकोली जवळ (ता. पंढरपूर) भीमेला मिळते. तेथून पुढे औज आणि टाकळी बंधार्यांत पाणीसाठा वाढल्याने सोलापूर शहराचाही पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल.
*चौकट*
कृष्णा-माणगंगा नदीजोड प्रकल्प राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ - पुणे यांच्या सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, आरफळ कालवे विभाग, करवडी(कराड) यांनी तयार करून सकारात्म क शिफारशींसह जलसंपदा विभागाकडे
पाठवला आहे. त्यास शासनाच्या अनेक उच्चस्तरीय अधिका-यांकडून प्रतिसाद मिळाला आहे.
*चौकट*
कृष्णा माणगंगा नदी जोड प्रकल्पा अंतर्गत ज्या तालुक्यांना कृष्णेच्या पाण्याचा लाभ होणार आहे ते १० तालुके :-
*सांगली जिल्हा* -कडेगाव,खानापूर,आटपाडी, जत, कवठेमहांकाळ आणि तासगाव.
*सातारा जिल्हा*- माण-म्हसवड,खटाव,
*सोलापूर जिल्हा*- सांगोला आणि मंगळवेढा.
Sunday, 10 January 2021
Friday, 8 January 2021
कृष्णा नदीच्या पाण्याचे फेर वाटप करा
कृष्णा नदीच्या पाण्याचे फेर वाटप करा
सद्य:स्थितीत खानापूर, आटपाडी, तासगांव व जत तालूक्यातील वंचित गांवे यासाठी सिंचन सुविधा देण्याची मागणी तीव्र आहे. बिगर सिंचनाचे शिल्लक पाणी प्रामुख्याने वारणा उप खो-यात असून व कोयना धरणाचे खाली कृष्णा नदी संगमाचे खाली उपलब्ध होऊ शकते. या बिगर सिंचन पाण्याचे फेर नियोजन करुन ते म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून ५ टी. एम. सी. व टेंभू उपसा सिंचन योजनेतून ८ टी.एम.सी.वापरासाठी उपलब्ध करता येऊ शकेल. यासाठी खानापूर, आटपाडी व इतर वंचित भागासाठी ५ टी.एम.सी.पाणी उपलब्ध करता येऊ शकेल. तसेच माण व खटाव तालूक्यासाठी ३ टी.एम.सी. पाणी उपलब्ध होऊ शकेल. खानापूर तालूक्यामधील वंचित गांवासाठी टेंभूची सद्य:स्थितीतील टप्पा ३(ब) ची उपलब्ध पंपीग क्षमता वापरुन खानापूर तासगांव कालव्यावरील प्रस्तावित उपसा सिंचन योजनेसाठी पाणी उपलब्धततेचे नियोजन :टेंभू प्रकल्पांतर्गत खानापूर तालुक्याचे एकूण सिंचन क्षेत्र १८,१७५ इतके हेक्टर आहे. तालुक्याचे क्षेत्र प्रामुख्याने टप्पा ३ (ब) वरील खानापूर तासगांव कालव्यावर ११,२९८ हेक्टर आहे व टप्पा ४ व ५ वर ६८७२ हेक्टर आहे. मा.आमदार अनिलभाऊ बाबर यांनी खानापूर तालुक्यातील वंचित गावांना टेंभू प्रकल्पाचा लाभ मिळावा यासाठी मा.मुख्यमंत्री यांना निवेदन देवून त्यांनी यावर मा.मुख्यमंत्री यांनी प्रस्ताव सादर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. टप्पा ३ (ब) चे मुळ क्षेत्र १८९७५ इतके हेक्टर होते. त्यापेकी ७७७० हेक्टर क्षेत्र हे तासंगांव तालुक्यातील होते. तथापि त्यासाठी स्वतंत्र उपसा सिंचन योजना केल्यामुळे सर्वसाधारण ८००० हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी अतिरीक्त पंपीग क्षमता ३ व या ठिकाणी उपलब्ध आहे. या अतिरीक्त पंपीग क्षमतेचा वापर करुन मा.लोकप्रतिनीधी यांनी केलेली मागणी व त्या भागातील भीषण टंचाईची वस्तुस्थिती लक्षात घेवून खानापूर तासगांव कालव्यावर दोन टण्प्यात २ टी.एम.सी. पाणी वापरुन ८००० हेक्टर क्षेत्रासाठी व वंचीत गावांसाठी लाभ देता येवू शकतो
या योजनेसाठी K१ उपखोन्यात कृष्णा लवादानुसार विगरसिंचनासाठी ३३ टी.एम.सी. इतकी तरतूद असून सद्यस्थितीत पाणी वापर ९ टी.एम.सी. इतका होतो. भविष्यकाळात वाढणारी लोकसंख्या व उद्योग यांचा विचार करुन जास्तीतजास्त पाणी वापर २० टी.एम.सी. इतका होवू शकतो. K१ उपखोऱ्यातील तसेच त्यालगतच्या उपखोन्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही. K१ उपखोऱ्यात बिगरसिंचनाच्या एकूण तरतूदीपैकी १३ टी.एम.सी. पाणी हे सिंचनासाठी उपलब्ध करता येवू शकते. या पाण्यापेकी २ टी.एम.सी. पाणी टेंभू प्रकल्पातील टप्पा ३आणि वरील खानापूर तासगांव कालव्यावर उपसा सिंचन योजना करून खानापूर तालुक्यातील वंचित गावांना लाभ देण्यासाठी नियोजन करता येईल. कृष्णा खोऱ्यात लवादानुसार समुच्यय पाणी वापर हा ५९४ टी.एम.सी. असून लवादाच्या मोजमापाच्या सूत्रानुसार प्रत्यक्ष ६६२ टी.एम.सी. पाणी वापर होणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीतील नियोजनानुसार होवू शकणा-या प्रत्यक्ष पाणी वापराची आकडेवारी उपरोक्त नमूद केली आहे. त्यामुळे कृष्णा खोन्यातील लवादाने दिलेल्या मर्यादित, अंतर्गत पाणी वापर करुन कायद्याच्या चौकटीत पाणी वापराचे उल्लंघन न करता या योजनेस पाणी देता येवू शकते.
आटपाडी, इतर वंचित गांवांसाठी नियोजन -
टेंभू टप्पा ३(अ) चे पुढे आटपाडी डावा कालव्यावर २००० हे. साठी उपसा सिंचन योजना राबवून आटपाडी तालूक्यातील वंचित गांवाना पाणी देता येऊ शकेल.
पाणी वापर वाढविण्यासाठी उपाययोजना -राज्यातील एकूण ५ उपखो-यांपैकी पाणी वापर वाढवणेसाठी मूळात त्याठिकाणी ७५ टक्के विश्वासर्हतेने अतिरीक्त पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी K-२, K-५ व K-६ या उपखो-यात ७५ टक्के विश्वासर्हतेने पाणी वापर वाढविणेसाठी पाणी शिल्लक दिसून येत नाही. तसेच K-३ उपखो- यामध्ये लवादाच्या निर्णयानुसार पाणी वापर वाढवण्यावर बंधन घातले आहे. त्यामुळे K-१ उपखो-यात मूवलक पाणी उपलब्ध असून तेथील प्रकल्पांचा पाणीवापर वाढविता येतो. मात्र पाणी वापर वाढविण्यासाठी अतिरिक्त पाणी साठे निर्माण करण्यास भौगालिक, सामाजिक , आर्थिक मर्यादा असून हा पाणी वापर मुख्यत: मोठया उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून पावसाळा कालावधीत वाढविता येतो. म्हणजे सोप्या भाषेत असे कि , सातारा - कराड चा कोयना काठ, सांगलीचा कृष्णा काठ , कोल्हापूरकडचा पंचगंगा वगैरे नदी काठचा भाग या ठिकाणी आता नवीन मोठ्या धरणांच्या, किंवा तलावांच्या साईट्स शिल्लक राहिलेल्या नाहीत. शिवाय जरी अशा साईट्स नव्याने निर्माण केल्या तरी आता या नद्यांच्या काठालगतचे समृद्ध भागातले लोक इतर ठिकाणच्या स्थलांतरासाठी तयार होतील का ? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आता नव्याने भू संपादन आणि पुनर्वसन या कामांसाठी सरकारकडे तितका पैसा आहे का ? असे अनेक प्रश्न आहेत. आजवरचा अनुभव पाहता या प्रश्नावर तोडगा म्हणून पाणी वापर वाढवण्यासाठी जिहे काठापूर सह टेंभू, ताकारी , म्हैसाळ या उपसा पाणी योजनांचा पाणी उचलण्याचा कालावधी वाढवणे तो आपण पावसाळ्याच्या काळात वाढवू शकतो. आता K-१ उपखो-यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ, उरमोडी आणि जिहे काठापूर या उपसा सिंचन योजना पावसाळा कालावधीत पूर्ण क्षमतेने चालवून पाणी वापर वाढविणे शक्य आहे. या योजनांच्या सर्वसाधारण संकल्पनेनुसार योजना चालविण्या चा कालावधी तीन हजार ते साडेतीन हजार तास (पूर्ण क्षमतेने) इतका येतो. म्हणजेच दिवसांच्या हिशोबात सांगायचे झाले तर १३० ते १४० दिवस इतका येतो. हाच कालावधी २०० दिवस (म्हणजे पाच हजार तास) इतका वाढवल्यास आपल्या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील टेंभू , ताकारीसह पाच हि उपसा सिंचन योजनांव्दारे अतिरीक्त २५ टी.एम.सी. पाणी वापर होऊ शकतो. या योजनांचे काही ठिकाणी विस्तारीकरण करुन २५ टी.एम.सी. पाणी वापराचे नियोजन करतान अवर्षण प्रवण भागातील मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये पाणी साठवून पाणी वापर करता येणे शक्य आहे. अवर्षण प्रवण भागातील मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये सरासरी ३० ते ३५ टक्के इतका पाणीसाठा होतो. त्यात प्रामुख्याने खानापूर, आटपाडी, जत, तासगांव, कवठेमहंकाळ, खटाव माण व सांगोला या तालूक्यामधील मध्यम आणि ल.पा. प्रकल्पात सरासरी २५ ते ३० टक्के इतकाच पाणी साठा होतो. तर काही वर्षे हे प्रकल्प पूर्णपणे कोरडे असतात. यामुळे कृष्णा खो-यातील पहिल्या लवादाच्या निर्णयानुसार पाणी वापर करण्यासाठी या ५ मोठ्या उपसा सिंचन योजना योजनांच्याद्वारे अतिरिक्त २५ टीएमसी पाणी वापराचे प्रथमतः करणे आवश्यक आहे. एका अभ्यासानुसार सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाणी योजनांमध्ये टेंभू १०, म्हैसाळ ७, ताकारी २ आणि उरमोडी व जिहे काठापूर प्रत्येकी ३ असे मिळून २५ टीएमसी पाणी वापर वाढवता येऊ शकतो. यातून सध्याच्या नियोजनापेक्षा १ लाख हेक्टर अधिक भाग आपण कमी खर्चात आणि आहे ती वितरण व्यवस्था वापरून भिजवू शकतो.
|
Monday, 21 December 2020
टेंभू कालव्याच्या जमीन खरेदीत अनागोंदी
टेंभूच्या कालव्याच्या बाधित जमिनी खरेदी करण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड अनागोंदी सुरू असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण टेंभू योजनेच्या कालव्याच्या जमीन खरेदी प्रक्रियेची चौकशीची मागणी लोकांकडून होत आहे.
Saturday, 29 June 2019
#नीरा - #देवघरचे राजकारण
Vijay Lale
निवडणुकीचा निकाल लागताच 'नीरा देवघर'चे पाणीवाटप सूत्र पूर्ववत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आता तर #देवेंद्र #फडणवीस सरकारने तसा निर्णयच जाहीर करून येत्या हंगामापासून तो अमलात आणण्याची घोषणा केली आहे. यामुळे #बारामती, #इंदापूर या तालुक्यांना गेली बारा वर्षे मिळणारे तब्बल अकरा #टिएमसी जादा #पाणी आता मिळणार नाही. http://www.evivek.com/Encyc/2019/6/24/neera-deoghar-dam
Saturday, 6 October 2018
या फे
मी सातत्याने टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या आराखड्यातील आणि एकूणच कामातील त्रुटींबाबत सातत्याने वेळोवेळी लिहीत आलो आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवत आलो आहे त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणून टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्याच्या पंप रहा बाबत मी या पंप आग्रहातून पाणी पळशी पर्यंत पोहोचू शकणार नाही असे सातत्याने लिहिले होते त्यानंतर आमदार अनिल भाऊ बाबर यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेत मी मांडलेल्या आणि लिहिलेल्या लेखन आणि बातम्यांच्या बाबतीत पुन्हा एकदा अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि नव्याने या टप्प्याचे सर्वेक्षण केले त्यानंतर माझे तर्क आणि अभियांत्रिकी माहिती बरोबर ठरली त्यातून ही गोष्ट समोर आली की पाचव्या टप्प्यातून खानापूर घाटमाथ्यावरील फक्त काही गावे भिजू शकतात अन्य गावे टेंभूच्या पाण्याविना राहतील त्यानंतर भूड येथील पाचवा टप्प्याच्या पंप गृहाची उंची वाढवण्याचे आणि घाटमाथ्यावरील पळशी तसेच घाटनांद्रे तिसंगी पर्यंत हे पाणी देण्याबाबत चा नवा आराखडा तयार करण्यात आला
पत्रकारिता करीत असताना आपल्या भागाच्या आणि लोकांच्या हितासाठी काम करावे असे अपेक्षित असते मला वाटते माझ्या परीने ते योग्य प्रकारे सुरू असावे आता टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या पाचव्या टप्प्या च्या पंप गृहाची उंची 838 tu मीटर वरून 858 मीटर पर्यंत वाढविण्यात आली आहे........ धन्यवाद !
Thursday, 10 November 2016
टेंभूचे पाणी अखेर विट्यात
टेंभूचे पाणी अखेर विट्यात दाखल
विटा : विजय लाळेSunday, 18 September 2016
टेंभू चा पहिला ठिबक आणि मीटर यशस्वी प्रयोग जुनोनी (जि. सोलापूर) तलावावर .
महाराष्ट्रातील टेंभू उपसा सिंचन योजनेवरचा पहिला ठिबक आणि मीटर ने पाणी वाटून घेण्याचा यशस्वी प्रयोग जुनोनी (ता. सांगोला , जि. सोलापूर) येथे तलावावर केला आहे. पाट बंधारे विभागाचे अधिकारी लक्ष्मण केंगार (शाखा अभियंता, बुध्दीहाळ तलाव), कालवा निरीक्षक भारत होनमाने, बिरदेव पाणी वापर सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल बापू होनमाने आणि त्या संस्थेचे १२२ सभासद यांनी हा प्रयोग निर्विवाद यशस्वी करून दाखवला आहे. तेथील आमदार गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने , अधिकाऱ्याच्या पारदर्शी कामामुळे आणि शेतकऱ्यांच्या परस्पर विश्वासाने जुनोनी येथे संपूर्ण महाराष्ट्रातला समन्यायी पाणी वाटपाचे धोरण अतिशय काटेकोरपाने राबविले जात आहे. जेवढे पाणी वापरले तेव
ढेच बिल भरायचे त्यामुळे कोणी कितीही पाणी वापरले तरी भांडणे, कटकटी होत नाहीत.
Friday, 9 September 2016
Friday, 2 September 2016
Monday, 29 August 2016
Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): डॉ . राजेंद्र सिंह राणा, एक माणूस बोगस
Sunday, 10 July 2016
घाणंद कालवा ढासळू लागला
भिकवडीला टेंभूचे पाणी मिळू शकते
भिकवडीला टेंभूचे पाणी मिळू शकते
Sunday, 19 June 2016
टेंभूचा येरळा जलसेतू खचण्याचा धोका
ता. १६/०६/२०१६
येरळेच्या पात्रातील काटेरी झाडे जेसीबीने उखडण्यात येत आहेत. त्यामुळे टेंभू योजनेच्या जलसेतूला खचण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. याबाबत टेंभूच्या वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे.
चितळी गावातून जाणार्या येरळा नदीच्या 500 मीटरच्या आडव्या पात्रावर टेंभू योजनेचा हा जलसेतू उभारलेला आहे. हा जलसेतू 15 वर्षांपूर्वी बांधलेला आहे. सध्या या जलसेतूच्या एकूणच भवितव्याशी वाळू माफिया मंडळींचा खेळ सुरू आहे. गेल्या सात- आठ वर्षांपासून येरळेच्या पात्रातील वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. अलिकडच्या काळात तर वाळू माफियांची मजल पार जलसेतूच्या खालच्या स्तंभांना इजा पोहोचवण्यापर्यंत गेली आहे. चितळी हद्दीत अजस्त्र जेसीबी आणि पोकलँडच्या सहाय्याने हा वाळू उपसा सुरू आहे. वास्तविक जलसेतूच्या 150 ते 200 फुटाच्या दोन्ही बाजूंकडील अंतरात काहीही करता येत नाही. या जागेवर शासनाची मालकी असते. मात्र सध्या येरळे नदीच्या परिसरातील मोठ-मोठाली काटेरी बाभळीची झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे. काही महाभागांनी पार जलसेतूच्या खालची झाडे जे वृक्ष म्हणण्याइतपत मोठे झाले आहेत ते जेसीबी सारख्या अजस्त्र यंत्रांच्या सहाय्याने मुळापासून उखडून टाकण्यात येत आहेत. परिणामी उद्या या वृक्ष उखडण्यामुळे तेथील वाळू उघडी होत आहे. या वाळूवर आता वाळू माफियांची नजर गेली आहे. परंतु या सगळ्यात पात्रातील जलसेतूच्या स्तंभांना खचण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. याबाबत चितळी आणि चिखलहोळ परिसरातील काही जागरूक लोकांनी आक्षेप घेतला तर त्यांनाच तुम्हाला काय करायचे आहे ? असे सुनावले जाते.
याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने जागेवर जावून माहिती घेतली असता दोन, तीन जेसीबी यंत्रांच्याव्दारे पात्रातील मोठ-मोठी झाडे उखडण्याचे काम सुरू असल्याचे दिसले. पश्चिमेच्या बाजूला कोळशाच्या भट्ट्या टाकल्या आहेत, त्या लोकांना पलिकडच्या काही शेतकर्यांनी झाडे तोडण्याचे कंत्राट दिल्याचे सांगण्यात आले. परंतु थेट जलसेतूच्या खालपर्यंत स्तंभाखालीच झाडे उखडण्याचे आणि वाळू उपसण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याबाबत आता टेंभूच्या वरिष्ठ अधिकार्यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.
Tuesday, 26 April 2016
टेंभू चे पाणी अग्रणीत सोडायचीच घाई का ? कशासाठी ?
जो पर्यंत कचरेवाडी आणि गोरेवाडी हे दोन कालवे पूर्ण होत नाहीत ,
तसेच अद्याप टेंभू च्या लाभ क्षेत्रा बाहेर असलेली उर्वरित १८ गावे टेंभू योजनेत समाविष्ट होत नाहीत तो पर्यंत
खानापूर घाट माथ्याला टेंभू च्या ४ आणि ५ व्या टप्प्यांचा काय फायदा ?
टेंभू चे पाणी अग्रणीत सोडायचीच घाई का ? कशासाठी ? हे आता सगळ्या लोकाना समजायला लागले आहे …














